harshwardhan jadhav | Sarkarnama

टिनपाट जिल्हाप्रमुखाच्या माफीनाम्यामुळे आंदोलन मागे - हर्षवर्धन जाधव

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : नंदुरबारच्या जिल्हाप्रमुखाने केलेल्या रिकामटेकडेपणामुळे मला नंदुरबारला जावे लागले. पण त्याने लिहून दिलेला माफीनामा रात्री पोलीस अधीक्षकानी दिला. आज जागतिक आदिवासी दिवस आहे, नंदुरबार जिल्ह्यात हा समाज मोठा आहे. एका टिनपाट माणसामुळे सामान्य आदिवासीना त्रास नको म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सरकारनामशी बोलताना सांगितले. 

नंदुरबारच्या शिवसेना जिल्हापक्षप्रमुखाने उद्या बंद करुन दाखवा या दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी हर्षवर्धन जाधव काल रात्रीच शेकडो कार्यकर्त्यांसह नंदुरबारला गेले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत जाधव यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाने आपल्या विधाना संदर्भात माफीनामा लिहून दिल्याचे सांगण्यात आले. तो माफीनामा आणि आदिवासी लोकांसाठी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन, आम्ही बंद किंवा आंदोलन न करण्याची सामंजस्याची भूमिका घेतली. अठरा पगड जातील सोबत घेऊन चालणारा मराठा समाज आहे. 

दिवाळी, ईदचे जसे महत्त्व आहे, तसे आदिवासी दिनाचे महत्त्व त्यांच्यासाठी असल्यानेच हा निर्णय मी घेतला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मराठा तरुण नंदुरबारमध्ये यायला निघाले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता, शिवाय ज्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने हा उद्योग केला, त्याने देखील माफी मगितल्यामुळे हा विषय आम्ही आणखी न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नाहीतर बंद करून दाखवलाच असता असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख