महाराष्ट्र केसरी होण्यासाठी हर्षवर्धन सदगीरने सोडला मोबाईलचा वापर - Harshwardha Sadgir Stopped Mobile use to Become Maharashtra Kesari | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्र केसरी होण्यासाठी हर्षवर्धन सदगीरने सोडला मोबाईलचा वापर

संपत देवगिरे 
शनिवार, 18 जानेवारी 2020

पैलवान हर्षदर्धन सदगीरने 'महाराष्ट्र केसरी' होण्यासाठी दीड वर्षापासून मोबाईलचा वापर सोडला आहे. आता तर तो मोबाईलचा वापर देखील विसरला आहे

नाशिक : हल्लीचे युग स्मार्ट फोनचे. चार- पाच वर्षाची मुलेही भ्रमणध्वनी वापरतात. युवा पिढी तर क्षणभरही त्याशिवाय राहू शकत नाही. मात्र थोडे मन पक्के करा. मात्र, हे ऐकल्यावर तुम्हाला आश्‍चर्याचा धक्का बसेल, की पैलवान हर्षदर्धन सदगीरने 'महाराष्ट्र केसरी' होण्यासाठी दीड वर्षापासून मोबाईलचा वापर सोडला आहे. आता तर तो मोबाईलचा वापर देखील विसरला आहे. मोबाईलचे ओझे वाटत असल्याने तो मोबाईल ठेवतच नाही.

महाभारतात अर्जुनाने आपले सर्व लक्ष्य फिरत्या माशाच्या डोळ्यांवर केंद्रीत केले होते. त्यात त्याला दुसरे काही दिसतच नव्हते. त्यातून त्याने माशाच्या डोळ्याचा अचुक लक्ष्यभेद करीत यशाला गवसणी घातली. हर्षवर्धन सदगीर हा अतिशय सामान्य कुटुंबातील. त्याने अतिशय प्रतिकुल स्थितीतून कुस्तीच्या क्षेत्रात प्रवेश केला. प्रारंभी गावच्या लहान कुस्तीचे फड गाजवले. त्यानंतर भगूरच्या बलकवडे व्यायामशाळेत सराव केला. मात्र, अधिक मोठ्या संधीसाठी पैलवान काका पवार यांच्या तालमीत पुण्याला प्रवेश घेतला. हे करतांना त्याचे सर्व लक्ष्य केवळ महाराष्ट्र केसरीची कुस्ती हेच होते. त्यामुळे त्याने मोबाईलचा वापर बंद केला. दीर्घकाळ तो मोबाईल व स्मार्ट फोन पासून दूर आहे.

सारावाच्या दरम्यान पहाटे पाच रात्री आठ असे त्यांचे वेळापत्रक होते. पहाटे पाचला उठुन नियमीत जोर- बैठक व व्यायाम, त्यानंतर अन्य व्यायाम, दुपारी बारा ते दोन कार्डिअॅक व दोरीवरच्या जलद उड्या, सायंकाळी पाचला कुस्तीचा सराव तंत्राचा अभ्यास करणे. या दरम्यान तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आहार. यात संपुर्ण लक्ष्य केवळ कुस्ती एव्हढेच होते. त्यामुळे यादरम्यान स्मार्टफोन अन्‌ भ्रमणध्वनीचा त्याला विसरच पडला. तो क्वचितच कोणाशी संपर्क साधत असे. त्याला फारसे कोणी संपर्क करीत नव्हते. 

नुकताच त्याने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यानंतर त्याला महाराष्ट्रभर निमंत्रणे येऊ लागली. त्याचा पहिला सत्कार व कार्यक्रम भगूर येथे झाला. सध्या जिल्ह्याच्या विविध भागातून त्याला निमंत्रणे येत आहेत. लोकांचे सत्कार नम्रपणे तो स्विकारतो. मात्र, या दरम्यान त्याच्याशी संपर्क करायचा प्रश्‍न येतो तेव्हा खुपच अडचण होते. कोरण त्याला मोबाईलचा विसर पडला आहे. त्याच्याकडे मोबाईलच नाही!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख