Harshwardha Patil's Help to Kakasaheb Shinde | Sarkarnama

आंदोलनातील हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना हर्षवर्धन पाटील यांचेकडून एक लाखाची मदत

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

इंदापूर येथील सकल मराठा ठिय्या आंदोलन मध्ये दिवसभर सहभागी होवून माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनात हुतात्मा झालेले युवक काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून एक लाख रूपयांची रक्कम जाहीर केली.

वडापुरी : इंदापूर येथील सकल मराठा ठिय्या आंदोलन मध्ये दिवसभर सहभागी होवून माजी मंञी हर्षवर्धन पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनात हुतात्मा झालेले युवक काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून एक लाख रूपयांची रक्कम जाहीर केली. सदरची रक्कम तातडीने हुतात्मा शिंदे कुटुंबियांच्या घरी पोहच केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

इंदापूर येथे प्रशासकीय भवन कार्यालयासमोर मराठा आरक्षण ठिय्या आंदोलनात माजी मंञी हर्षवर्धन पाटील हे आज शनिवारी( दि.28) दिवसभर सहभागी झाले होते. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख