इंदापूरवर खूष असलेल्या पवारांनी हर्षवर्धन यांना शेजारी तर; भरणेंना पुढच्या सिटवर बसवले!

इंदापूरवर खूष असलेल्या पवारांनी हर्षवर्धन यांना शेजारी तर; भरणेंना पुढच्या सिटवर बसवले!

वालचंदनगर :  इंदापूर तालुक्यातील दुष्काळी दौऱ्यामध्ये  केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या  गाडीमध्ये आमदार दत्तात्रेय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र बसून दुष्काळी गावांचा दौरा केला.

लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक होते. आमदार भरणे व माजी मंत्री पाटील हे दोन्ही पक्षाचे प्रमुख एकमेकांना नेहमी पाण्यात पाहत होते. मात्र लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व पवार कुंटूबाचे मनोमिलन झाल्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.

एकमेकांवर टिकेची झोड उडविणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र येवून खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचाराची इंदापूर तालुक्यामध्ये धुरा सांभाळली. याचा परीणाम निवडणुकीच्या निकालामध्ये जाणवला. दोन्ही पक्षाने एकदिलाने काम केल्यामुळे   इंदापूर तालुक्यातील खासदार सुळे यांना ७० हजार ९३८  विक्रमी  मताधिक्य मिळाले व सुळे यांना मोदी लाटेमध्ये ही सहज विजय मिळवता आला.

निवडणुकीच्या निकालानंतर पवार हे इंदापूर तालुक्यावर खूष असल्याची चर्चा सुरु आहे. पवारांनी निकाल संपल्यानंतर तातडीने राज्यामध्ये दुष्काळी दौरे करण्यास सुरवात केली. आज रविवार (ता.२६) रोजी दौऱ्यामध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना ही आवर्जून सहभागी  होण्यास सांगितले होते.  या दोघांशिवाय जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादीचे  जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , लालासाहेब पवार, अप्पासाहेब जगदाळे, मयूर पाटील, महारुद्र पाटील, कृष्णाजी यादव यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी व कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आजच्या दौऱ्यामध्ये माजी मंत्री पाटील हे पवार साहेबांच्या गाडीत त्यांच्या शेजारी  व भरणे हे पुढील सिटवरती बसले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com