हर्षवर्धन पाटील यांची कन्या  अंकिता घेणार जिल्हा परिषदेतून राजकारणात एन्ट्री  - Harshawardhan Patil's political legacy will be run by daughter Ankita | Politics Marathi News - Sarkarnama

हर्षवर्धन पाटील यांची कन्या  अंकिता घेणार जिल्हा परिषदेतून राजकारणात एन्ट्री 

राजकुमार थोरात 
बुधवार, 5 जून 2019

कॉग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता हर्षवर्धन पाटील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणूक लढवत असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन राजकारणामध्ये प्रवेश करणार आहेत. 

वालचंदनगर :  कॉग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता हर्षवर्धन पाटील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणूक लढवत असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन राजकारणामध्ये प्रवेश करणार आहेत. 

हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री स्वर्गीय रत्नप्रभादेवी पाटील यांचे जानेवरी महिन्यामध्ये निधन झाल्यामुळे बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषदेचे जागा रिक्त झाली होती. या गटातील पोटनिवडणूकेचा कार्यक्रम जाहिर झाला आहे.  दोन दिवसापूर्वी कॉग्रेसच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी पाटील घरातील उमेदवार देण्याची मागणी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे केली होती.

 आज बुधवार (ता.५) रोजी अंकिता पाटील यांची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारीची घोषणा करण्यात आली असून गुरुवार (ता.६) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अंकिता पाटील या उच्चशिक्षित आहेत. तसेच सध्या त्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा व इंडियन शुगर मिल्स असोसिएशन च्या सदस्या आहेत . त्यांचा सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन राजकारणामध्ये आगामी काळामध्ये सक्रिय होणार आहेत.

स्वर्गीय बाजीराव पाटील, स्वर्गीय शहाजीराव पाटील  आणि स्वर्गीय शंकरराव पाटील    यांच्यानंतर हर्षवर्धन पाटील  यांनी राजकारणाबरोबर समाजकारण करुन राजकीय वारसा पुढे चालवला आहे .  आगामी काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांना, अंकिता  पाटील राजकारण व समाजकारणामध्ये मदत करणार असून जिल्हा परिषद ही भावी राजकारणाची पहिली पायरी मानली जाते . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख