हर्षवर्धन पाटील कोणाला सभापती करणार ? 

पाटील यांच्या गटामध्ये आठपैकी चार पंचायत समिती महिला सदस्यांचा समावेश असूनयामध्येबिजवडी गणातून पुष्पा रेडके व काटी गणातील स्वाती शेंडे असून सभापती पदासाठी दावेदार झाल्या आहेत.
pushpa-redke-swati-shende
pushpa-redke-swati-shende

वालचंदनगर:  इंदापूर पंचायत समितीवर माजी सहकारमंत्री  हर्षवर्धन पाटलांच्या गटाचे वर्चस्व असून सभापतीपदासाठी पुष्पा रेडके व स्वाती शेंडे दावेदार झाल्या असून सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.


आज पुणे जिल्हा परिषदेमध्ये पुणे जिल्हातील पंचायत समितीच्या सभापती पदाच्या आरक्षणाच्या सोडती पार पडल्या. इंदापूर तालुक्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी सभापती पद आरक्षीत करण्यात आले. अडीच वर्षापूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणूकीमध्ये कॉग्रेसला आठ व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला सहा जागा मिळाल्या होत्या. 


निवडणूकीनंतर सभापती करणसिंह घोलप यांना सभापती होण्याचा बहुमान मिळाला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूकेपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी कॉग्रेसमधून भाजपमध्ये केला.  इंदापूर पंचायत समितीवर हर्षवर्धन पाटील यांच्या गटाची एकहाती सत्ता असल्याने पाटील यांच्या विचाराचा सभापती होणार आहेत.


 पाटील यांच्या गटामध्ये आठपैकी चार पंचायत समिती महिला सदस्यांचा समावेश असून  यामध्ये  बिजवडी गणातून पुष्पा रेडके व काटी गणातील स्वाती शेंडे असून सभापती पदासाठी दावेदार झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये काटी-वडापुरी गटानेही हर्षवर्धन पाटील यांना मताधिक्य दिले होते. तर बिजवडी पंचायत समितीचा गट हा पाटील यांचा बालेकिल्ला असून दोघीपैंकी सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com