कन्नड :  हर्षवर्धन जाधव पिछाडीवर  शिवसेनेचे उदयसिंग राजपूत 13 हजार मतांनी आघाडीवर

कन्नड :  हर्षवर्धन जाधव पिछाडीवर  शिवसेनेचे उदयसिंग राजपूत 13 हजार मतांनी आघाडीवर

औरंगाबादः संपुर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उदयसिंग राजपूत 13 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेनेचे माजी आमदार व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याशी त्यांची थेट लढत होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसैनिकांवर खालच्या पातळीवर जाऊन जाधव यांनी प्रचारा दरम्यान टिका केली होती, त्याचा मोठा फटका त्यांना बसतांना दिसतो आहे.

18 व्या फेरीअखेर शिवसेनेचे उदयसिंग राजपूत यांना 56798 तर हर्षवर्धन जाधव यांना 44081 मते मिळाली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संतोष कोल्हे 32918 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवली होती. 2 लाख 83 हजार मते मिळवत त्यांनी मोठ्या प्रमाणात मतविभाजन केले होते. त्याचा थेट परिणाम शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर झाला होता.

परिणामी वीस वर्षानंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा पराभव होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील निवडूण आले होते. जाधव हेच शिवसेनेच्या पराभवाला कारणीभूत असल्यामुळे जाधव यांना पराभूत करण्याचा शिवसैनिकांनी निर्धार केला होता. अशातच हर्षवर्धन जाधव यांनी केलेले शिवसेना विरोधी विधानाचा फटाक त्यांना मोठ्या प्रमाणात बसतांना दिसतो आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com