harshawardhan jadhav mla birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : हर्षवर्धन जाधव आमदार,कन्नड-सोयगांव) (शिवसेना) 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 18 जून 2018

औरंगाबाद : शिवसेनेचे कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांचा आज वाढदिवस. माजी आमदार स्व. रायभानजी जाधव यांच्या निधनानंतर हर्षवर्धन यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरवात केली होती. 

आक्रमक नेतृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी 2009 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. दरम्यानच्या काळात घडलेल्या घटना घडामोडींवरून त्यांचे राज ठाकरे यांच्याशी असलेले संबंध बिघडले आणि त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. 

2014 मध्ये दुसऱ्यांदा कन्नड मतदारसंघातून ते शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले. आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी मंत्री, नेत्यांना घेराव घालणे, जाब विचारणे आणि आक्रमक आंदोलन उभारून प्रश्‍न मार्गी लावण्याकडे हर्षवर्धन जाधव यांचा नेहमीच कल राहिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे ते जावई आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख