'मागीलवेळी पक्षश्रेष्ठींमुळे थांबले, पण आता नाही!

शेवगाव-पाथर्डीतून राजळे यांना पुन्हा उमेदवारी नको म्हणून काही कार्यकर्ते वारंवार सांगत आहेत.
'मागीलवेळी पक्षश्रेष्ठींमुळे थांबले, पण आता नाही!

नगर : ''मागीलवेळी पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे थांबले. त्यावेळी उमेदवारीच्या फॉर्मवर सह्या झालेल्या असताना थांबण्याची वेळ आली. आता कुठवर थांबायचं. आता लढायचंच,'' असा निर्धार शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी 'सरकारनामा'शी बोलून दाखविला.

महिनाभरापासून काकडे यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज ठाकूर निमगाव (ता. शेवगाव) येथील सभेत त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवावर निवडणूक लढवू, असे जाहीर केले.

भारतीय जनता पक्षाच्या आमदार मोनिका राजळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने आपण कशी उमेदवारी करणार? असे विचारले असता, काकडे म्हणाल्या, पक्षश्रेष्ठींकडे आपण उमेदवारीची मागणी करणार आहोत. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात विशेष कामे झाली नसल्याने सर्वसामान्यांची मोठी ओरड आहे. त्यामुळेच आपल्या उमेदवारीसाठी आग्रह होत आहे. या शिवाय शेवगाव-पाथर्डीतून राजळे यांना पुन्हा उमेदवारी नको म्हणून काही कार्यकर्ते वारंवार सांगत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी आशा आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com