माजी आमदारांच्या भूलथापांना माण-खटावची जनता भुलणार नाही : हर्षदा देशमुख-जाधव

''माण तालुक्यात माजी आमदारांकडून 'एमआयडीसी' आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या शंभर एकरातील 'एमआयडीसी' मध्ये मोठे उद्योग सोडाच, पण गुळाचे चांगले गुऱ्हाळ देखील सुरु होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या अशा भूलथापांना माण-खटावची जनता भुलणार नाही. माण-खटाव मतदारसंघाच्या औद्योगिक विकासासाठी प्रभाकर देशमुख यांनाच साथ द्यावी,'' असे आवाहन हर्षदा देशमुख-जाधव यांनी केले.
Harshada Deshmukh Jadhav Campaigning for Prabhakar Deshmukh
Harshada Deshmukh Jadhav Campaigning for Prabhakar Deshmukh

गोंदवले  : ''माण तालुक्यात माजी आमदारांकडून 'एमआयडीसी' आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या शंभर एकरातील 'एमआयडीसी' मध्ये मोठे उद्योग सोडाच, पण गुळाचे चांगले गुऱ्हाळ देखील सुरु होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या अशा भूलथापांना माण-खटावची जनता भुलणार नाही. माण-खटाव मतदारसंघाच्या औद्योगिक विकासासाठी प्रभाकर देशमुख यांनाच साथ द्यावी,'' असे आवाहन हर्षदा देशमुख-जाधव यांनी केले.

 माण विधानसभा मतदारसंघात 'आमचं ठरलंय' टीमचे उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ सत्रेवाडी (पिंगळी) येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत हर्षदा देशमुख-जाधव बोलत होत्या. त्यावेळी नगरसेवक अजित पवार, बाबाराजे हुलगे, विभावरी भोसले, सुभाष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, ''माण मतदारसंघात मीच पाणी आणल्याचे माजी आमदार सांगत सुटले आहेत. सगळीकडे पाणी आणले म्हणणाऱ्या या माजी आमदारांच्या बोराटवाडी गावात मग टँकर का सुरु होता? माणमध्ये 'एमआयडीसी' आणल्याचेही हे सांगत आहेत. मात्र केवळ शंभर एकर जागेतील 'एमआयडीसी'  मध्ये मोठे उद्योग कुठून येणार? त्यामुळे केवळ भूलथापा देणाऱ्यावर विश्वास ठेवू नका. त्यांना आता घरी बसविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा.''

त्या पुढे म्हणाल्या, ''प्रभाकर देशमुख यांनी प्रशासकीय काळापासून माणमधील दुष्काळ हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जलसंधारणाच्या माध्यमातून गावोगावी पावसाचे पाणी अडविण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नामुळे गावे पाणीदार झाली आहेत. पाण्याची उपलब्धता झाल्याने आता पाच हजार एकरात 'एमआयडीसी'  उभारण्यासाठी प्रभाकर देशमुख प्रयत्नशील आहेत.'' मतदारसंघातील दुष्काळ हद्दपार करण्याबरोबरच उच्च प्रतीचे शिक्षण, आरोग्य सुविधा व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या प्रभाकर देशमुख यांना मताधिक्य द्या, असे आवाहनही हर्षदा देशमुख-जाधव यांनी केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com