मी अजूनही फिट; विरोधकाला घाम फोडणार - हरिभाऊ बागडे

haribhau_bagde
haribhau_bagde

औरंगाबादः वयाच्या पंच्याहत्तरीत पोहचलेल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी 'मी अजूनही फिट आहे, विरोधकाला घाम फोडू शकतो, थकवू शकतो' अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेस उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना सूचक इशारा दिला.


 भाजपमध्ये उमेदवारी देतांना वय नाही, तर त्या व्यक्तीची काम करण्याची जिद्द आणि हिंमत पाहिली जाते असे सांगत वयाच्या निकषावरून आपली उमेदवारी कापली जाईल या आशेवर बसलेल्या स्वपक्षातील इच्छूकांना देखील टोला लगावला.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. वाढेत वय या निकषामुळे बागडे यांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाही अशी चर्चा जिल्ह्यात सुरू होती. पण पक्षाने उमेदवारी देतांना बागडे यांचा राजकारणातील दांडगा अनुभव विचारात घेत, त्यांनाच मैदानात उतरवले.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहरातील संपर्क कार्यालयात बागडे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना, वयाच्या मुद्यावरून तुमची उमेदवारी कापली जाणार या चर्चे संदर्भात बागडे यांना विचारले असता ते म्हणाले, भाजपच्या घटनेत निवडणुक लढवण्यासाठी वयाची अट किंवा त्या बाबतचा कुठलाही असा नियम नाही.  मी पंच्याहत्तर वर्षांचा झालो असलो तरी मी अजूनही फीट आहे, मतदारसंघातील वाड्या, वस्त्या, तांड्यावर जाऊन मी लोकांचे प्रश्‍न जाणून घेतो, ते सोडवतो.

गेल्या कित्येक वर्षात मी आजारीही पडलेलो नाही, त्यामुळे मी प्रकृती सांभाळून आहे. मी अजूनही इतका फीट आहे, की विरोधकाला थकवू शकतो. मुळात मला उमेदवारी मिळणार नाही ही अफवा कुठून आली माहित नाही. भाजपमधील पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारसंघातील नागरिकांची मला पुन्हा उमेदवारी मिळावी अशी इच्छा होती. तरुणांपासून ते 80 वर्षाच्या आजीपर्यंत सगळेचजण माझ्या निवडणूक प्रचारात सहभागी व्हायला तयार असल्याचेही हरिभाऊ बागडे यांनी यावेळी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com