कॉंग्रेसबरोबर गेल्याने शिवसेनेची मानसिकता  बदलली का ? हरिभाऊ बागडे 

मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उप मुख्यमंत्री व गृहमंत्री होते. या दोघांनी ठरवून बांगला देशाच्या लोकांना परत पाठवले. ते आजचे लोक विसरले.
Haribhau_Bagde criticizes ShivSena
Haribhau_Bagde criticizes ShivSena

औरंगाबाद: महाराष्ट्रात युतीचे सरकार होते. तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उप मुख्यमंत्री व गृहमंत्री होते. या दोघांनी ठरवून बांगला देशाच्या लोकांना परत पाठवले. ते आजचे लोक विसरले. इतक्‍या लवकर विसरले. आता भलेही कॉंग्रेस बरोबर गेला असला, तरी तुमची मानसिकता का बदलली?  असा टोला माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नागरिकत्व कायद्यावरून शिवसेनेला लगावला.

राष्ट्रीय सुरक्षा मंचातर्फे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ बुधवारी (ता.25) भव्य फेरी आणि सभा घेण्यात आली. यावेळी श्री.बागडे बोलत होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षातर्फे राज्यभरात मोर्चे काढण्यात येत आहेत . यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसापासून भाजप आणि संघाशी निगडीत असलेल्या विविध संघटनातर्फे कायद्याच्या समर्थनासाठी मोर्च आणि रॅली काढण्यात येत आहेत .

मराठवाड्यात मंगळवारी (ता.24) जालना, लातूर या शहरातील समर्थनासाठी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर बुधवारी सकाळी 11 वाजता क्रांती चौकातून ही रॅली काढण्यात आली. यात "वूई  सर्पोट सीएए', 'तिरंगे के सन्मान मे देशभक्‍त मैदान मे', 'सीएए के सन्मान मे देशभक्‍त मैदान मे' यासह 'मोदी- मोदी' यासह तिरंगा झेंडा घेऊन विविध घोषणा रॅलीत सहभागी झालेल्यांनी देशभक्‍तांनी दिल्या . 


 क्रांती चौकातून ही रॅली निघाली .  जिल्हा न्यायालय , विवेकानंद महाविद्यालयात, स्वातंत्र्यवीर सावकर चौक, निराला बाजार मार्गे  औरंगापुऱ्यातील महात्मा फुले चौकात आली तेथे या रॅलीचा समारोप झाला.


यावेळी पाकिस्तानातून आलेल्या आणि औरंगाबाद शहरात पंधरा ते तीस वर्षांपासून राहणाऱ्या  किशोर बोधाणी, विकी तलरेजा,बलराम पारसवाणी, श्रीचंद्र तालेजा, अमृत नाथानी यांना या कायद्या अंतर्गत नागरिकत्व मिळणार आहे. या पाचही जणांचा  माजी राज्यमंत्री अतुल सावे, किशनंचद तनवाणी, डॉ.भागवत कराड, एकनाथ जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हरिभाऊ बागडे म्हणाले,  1947 ते 66 या काळात पाकिस्तान मधील 70 टक्‍के हिंदू लोक विस्थापित झाले. बौद्ध धर्मावर मोठा अत्याचार झाला आहे.  हा कायदा संसदेत  पास झाला. तसा कायदा  पास व्हावा यासाठी  2003 मध्ये  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी  राज्यसभेत विरोधीपक्ष नेते असताना  मागणी केली होती. हा कायदा झाला पाहिजे . नागरिकत्व दिले पाहिजे .  असा प्रकारचा कायदा लवकर करा. अशी  मागणी करणारे भाषण मनमोहनसिंग यांनी केले होते. 


आता ते आपण केलेले भाषण विसरले. आता गांधीच्या समाधीजवळ जाऊन बसतात. तुमचे भाषण बघा, काय होते ते पहा, आता बदललं का? दहा वर्षे पंतप्रधान राहिले. का वाटले नाही, बदल करायला. मनमोहन सिंगाच्या हातात काहीच नव्हते. कॉंग्रेसने ठरवलं असते तर झाले असते .पण कॉंग्रेसला करायचं नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com