haribhau bagade and amul dairy | Sarkarnama

हरिभाऊ बागडेंची अमुलच्या गुजरातमधील प्रकल्पाला भेट ...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. एका खाजगी कार्यक्रमासाठी आज (ता.21) ते अहमदाबादमध्ये होते. औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आणि शेतकरी असलेल्या बागडेंनी दौऱ्यातून वेळ काढून अमुलच्या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. आता अमुलमधील कार्यपध्दती ते आपल्या दुध संघात देखील लागू करतात का ? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

औरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. एका खाजगी कार्यक्रमासाठी आज (ता.21) ते अहमदाबादमध्ये होते. औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आणि शेतकरी असलेल्या बागडेंनी दौऱ्यातून वेळ काढून अमुलच्या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. आता अमुलमधील कार्यपध्दती ते आपल्या दुध संघात देखील लागू करतात का ? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे शेतीप्रेम सर्वश्रुत आहे. चार वर्षापुर्वी जिल्हा दुध संघाचा कारभार हातात घेतल्यापासून त्यांनी अनेक नवे प्रयोग आणि उत्पादने बाजारात आणत महानंदला राज्यभरात ख्याती मिळवून दिली. दुध संघाला होणाऱ्या नफ्यातून शेतकरी, दूध उत्पादकांना लाभांश, वाढीव दर देतांनाच त्यांनी महानंदची अनेक उत्पादने राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचा प्रयत्न केला. मतदारसंघ, विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असतांनाच शेतकरी म्हणून त्यांनी दूध संघालाही तितकाच वेळ दिला. राज्यात आणि देशात दूध संघाशी संबंधित नवे तंत्रज्ञान, उत्पादने याची माहिती हरिभाऊ बागडे वेळोवेळी घेत असतात. 

विशेष म्हणजे बागडे ज्या भाजप पक्षात आहे, त्या पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गुजरात मॉडेलचा दणकावून प्रचार करत केंद्रात सत्ता मिळवली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव इमानदार यांच्या जन्मशताब्दी वर्ष समाप्ती सोहळ्याच्या निमित्ताने बागडे आज अहमदाबादेत होते. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर बागडेंनी दुध आणि त्यापासून बनवण्यात येणाऱ्या विविध पदार्थांसाठी प्रसिध्द असलेल्या अमुलच्या प्रकल्पाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. अमुलच्या अध्यक्षांसह संचालकांनी बागडेंना अहमदाबादेतील प्रक्‍लपात बागडेंची स्वागत करत त्यांना प्रकल्प आणि तिथे तयार होणाऱ्या उत्पादनांची सखोल माहिती दिली. 

आता अमुलमधील स्वच्छता, तेथील दर्जेदार उत्पादने यांच्याशी तुलना करत हरिभाऊ बागडे औरंगाबादेत परतल्यानंतर त्यातील काही गोष्टी जिल्हा दूध संघात लागू करतात का हे पहावे लागेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख