हार्दिक पटेल महाराष्ट्रात करणार कॉंग्रेसचा प्रचार

अकोला येथे कार्यक्रमाला जाण्यासाठी हार्दिक पटेल नागपूरला आले होते. या दरम्यान ते नितीन राऊत यांच्या घरी गेले. राऊत यांच्या निवासस्थानी सुमारे एक तास दोघांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर चर्चा केली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती जाणून घेतली. कॉंग्रेसची तयारी तसेच इतर राजकीय घडामोडींवरही त्यांनी चर्चा केली.
Hardik Patel Will Campaign for Congress In Nagpur
Hardik Patel Will Campaign for Congress In Nagpur

नागपूर : गुजरातमधील कॉंग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनीही त्यांना निश्‍चितच प्रचाराला बोलाऊ, असे सांगून त्यांचे स्वागत केले.

अकोला येथे कार्यक्रमाला जाण्यासाठी हार्दिक पटेल नागपूरला आले होते. या दरम्यान ते नितीन राऊत यांच्या घरी गेले. राऊत यांच्या निवासस्थानी सुमारे एक तास दोघांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर चर्चा केली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती जाणून घेतली. कॉंग्रेसची तयारी तसेच इतर राजकीय घडामोडींवरही त्यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी नितीन राऊत यांना गुजरातमध्ये येण्याचे निमंत्रण दिले.

हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे केले आहे. गुजरातमध्ये त्यांच्या आंदोलनाची सत्ताधारी भाजपने चांगलीच धास्ती घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com