कार्यकर्त्याची जिद्द आणि अपार कष्ट म्हणूनच भाजप आज सत्तेत - हरिभाऊ बागडे

जिथे सत्ता मिळाली तिचा लोकांसाठी वापर केला. त्यातून लोकांचे समर्थन मिळत गेले. त्यामुळेच आजचे भाजपचे चित्र देशात बघायला मिळत आहे. अशी भावना विधानसभाचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केली.
hard work of bjp workers bears fruit says haribhau bagde 
hard work of bjp workers bears fruit says haribhau bagde 

औरंगाबाद: भारतीय जनता पक्षाची स्थापना होऊन आज चाळीस वर्ष झाली. या चार दशकात पक्षाने अनेक चढ-उतार बघितले. संसदेत केवळ दोन खासदार असलेला हा पक्ष संपणार असे आरोप विरोधकांकडून करण्यात येत होते, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम केले, लोकांचा विश्वास संपादन केला. जिथे सत्ता मिळाली तिचा लोकांसाठी  वापर केला. त्यातून लोकांचे समर्थन मिळत गेले. त्यामुळेच आजचे भाजपचे चित्र देशात बघायला मिळत आहे. अशी भावना विधानसभाचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केली.

भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या वाटचालीविषयी विविध पैलू उलगडतांना बागडे म्हणाले, भाजपच्या पूर्वी जनसंघ होता मधल्या काळात जनता पक्ष होता.  1967 मध्ये काही पक्षाबरोबर भागीदारीत (पार्टनरशिप) जनसंघ सत्तेत आला. त्यात मध्य प्रदेश,राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्याचा समावेश होता. त्यानंतरच्या काळात जनसंघ स्वतंत्र झाला व जनता पक्षातून 90 खासदार जे जनसंघाचा गट होते ते बाहेर पडले.

6 एप्रिल 1980 मध्ये भाजपची स्थापना झाली. या चाळीस वर्षाच्या काळात भाजपने अनेक वेळा केंद्र आणि राज्यात सत्ता मिळवली. ह्याच काळात इतर पक्षातील मोठे कार्यकर्ते भाजपमध्ये आले यात जे जनसंघात नव्हते ते सुद्धा आले. यात प्रामुख्याने सुषमा स्वराज सारखे मोठे नेते पक्षात आले.

आता केंद्रात दुसऱ्यांदा सत्ता मिळाली, अनेक राज्यात सत्ता मिळाली . भाजप देशात एक नंबरचा पक्ष झाला आहे. हा एकमेव पक्ष असा आहे की, जो कधीच फुटला नाही. कारण या पक्षाच्या घटनेत लिहिले आहे, जो इच्छा व्यक्त करतो त्याला पक्षात घ्यावे लागते . त्यामुळे अनेकजण पक्षात आले असून ते चांगले काम करत असल्याचेही बागडे यांनी सांगितले.

पक्षात पूर्वी तिकीट घेण्यासाठी फारसे कोणी आग्रही नसायचे.  तिकीट घेणाऱ्यांची संख्याही कमी होती. कोणाला उभे केल्यानंतर अधिक मते पडतील, कोण जास्त मते घेईल, जो जास्त मते घेऊ शकतो त्यालाच उभे करण्याची पद्धत होती. विचार करूनच ही पध्दत अवलंबली जात होती, त्यावेळी स्पर्धा कमी होती. राजकारणात गेले पाहिजेत आपण काहीतरी मानाचे पद मिळाले पाहिजेत अशी
इच्छा असणाऱ्यांची संख्या कमी होती. आताच्या काळात स्पर्धा आणि लोकांची इच्छा वाढली आहे. 

तिकीट देताना पूर्वी तो कार्यकर्ता किती वर्षापासून काम करतो , त्या कार्यकर्त्यां विषयी  लोकांचे मत काय, तो लोकांना वेळ देतोय का, त्याचे वर्तन  हे पाहून त्याला उमेदवारी देण्यात येत होती .आता जो निवडून येईल एवढाच निकष पाहिला जातो .हा निकष केवळ भाजपलाच नाही, तर सर्वच पक्षांना लागू झाला आहे. इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या मुळे काही कार्यकर्ते नाराज होतात , मात्र पक्ष सर्वांचा विचार करत असतो. असेही बागडे म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीने आमचा मित्र पळवला
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले. सर्वसामान्यांची कामे अधिक गतीने झाली, विकासाचे मॉडेल पाच वर्षात तयार झाले. सर्वसामान्यांच्या मनात काम करणारे हे सरकार असल्याचा विश्वास निर्माण झाला, याचे फळ म्हणून लोकांनी युतीच्या पारड्यात मते टाकली. मात्र मुख्यमंत्री पद नाही, तर किमान मंत्रिमंडळात स्थान मिळेल या उद्देशाने काँग्रेस व राष्ट्रवादीने खेळी करून आमच्या मित्र पक्षाला बाजूला करत सत्ता मिळवली.

कोरोनाचे सावट नसते तर भाजप स्थापना दिवस गेल्या वर्षी प्रमाणे साजरा झाला असता. जेव्हा जेव्हा पक्षावर संकट येते तेव्हा तेव्हा कार्यकर्ता मोठ्या जोमाने कामाला लागतो. त्यामुळे आम्ही सत्तेत नसलो तरी हा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला असता.

कोरोना संकटात मदतीसाठी भाजप कार्यकर्ता तत्पर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानुसार भाजप पक्षाच्या " आपदा कोषात सर्व आमदारांनी एक ते दोन लाख रुपये टाकले आहेत. या सर्व पंतप्रधान आपदा कोषात प्रत्येक कार्यकर्ता  आपापल्या परीने मदत करीत असल्याचेही बागडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com