आजचा वाढदिवस : हंसराज अहीर, केंद्रीय मंत्री, भाजप. - hansraj ahir minister | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : हंसराज अहीर, केंद्रीय मंत्री, भाजप.

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेले हंसराज अहीर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. चंद्रपूरमध्ये भाजपचे सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची राजकीय सुरवात झाली. त्यानंतर त्यांची विधान परिषदेत निवड झाली होती. ते 1999 पासून लोकसभेत भाजपचे प्रतिनिधित्व करीत आहेत. देशात सर्वत्र गाजलेला कोळसा घोटाळा त्यांनी बाहेर काढला होता. त्यावेळी ते देशाच्या राजकारणात प्रसिद्ध झाले होते. त्यांनी केलेल्या कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जाहीरपणे दखल घेतली होती. ते सध्या केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत. विदर्भातील भाजपचे एक प्रमुख नेते त्यांची म्हणून गणना होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख