Hanging Position in Maval and Shirur | Sarkarnama

युती व उमेदवारांमुळे भाजप, राष्ट्रवादीचं शिरूर आणि मावळमध्ये अडलयं घोडं

उत्तम कुटे
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

मावळ आणि शिरूर लोकसभेच्या उमेदवारांचे चित्र फक्त शिवसेनेचं स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी अजूनही प्रबळ उमेदवारांच्या शोधात आहे. तर, युतीचं भविष्य हेलकावे खात असल्याने भाजपचंही घोडं इथं अडलेलं आहे. 

पिंपरी : मावळ आणि शिरूर लोकसभेच्या उमेदवारांचे चित्र फक्त शिवसेनेचं स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी अजूनही प्रबळ उमेदवारांच्या शोधात आहे. तर, युतीचं भविष्य हेलकावे खात असल्याने भाजपचंही घोडं इथं अडलेलं आहे.  दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरुरसाठी आपल्याकडे चार-पाच प्रबळ उमेदवार असल्याचे नुकतेच पुणे येथे जाहीर केले. त्यामुळे तेथे खासदारकीचा चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळरावदादा-पाटील यांच्याविरुद्धचा हा 'दुसरा' कोण? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

तीन आमदार म्हणजे फक्त अर्धी खासदारकी असलेल्या पिंपरी चिंचवड शहराचा समावेश मावळ आणि शिरुर असा दोन्हीकडे आहे. त्यामुळे अर्धी खासदारकी असलेल्या उद्योगनगरीला दोन खासदार आहेत. ते दोन्ही शिवसेनेचे आहेत. तेच पुन्हा लढणार आहेत,हे जवळपास नक्की आहे. शिरूर हा शिवसेनेचा गडच झाला आहे. तेथे आढळराव यांनी हँटट्रिक केलेली आहे. आता ते चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. तर, मावळात शिवसेनेने हँटट्रिकसाठी कंबर कसली आहे. तेथूनही विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवार निश्चित झाल्यात जमा आहे.

दुसरीकडे दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्यात जमा आहे. त्यात या दोन्ही राष्ट्रवादीकडे आहेत मात्र, त्याचे उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत. ज्यांनी तेथे तयारी सुरू केली होती, त्यांनीही ती आता थांबवलेली आहे. यापेक्षा भाजपची स्थिती व्दिधा आहे. युती झाली, तर प्रश्नच नाही.मात्र, ऐनवेळी ती झाली नाही, तर त्यांनाही तयारी करावी लागणार आहे. मात्र, युती होण्याची शक्यता असल्याने उमेदवारीबाबत ते निर्धास्त आहेत. कारण युतीच्या जागावाटपात या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख