handover smart city 31 crore intrerest revenue to CM Fund | Sarkarnama

भाजप नेते वसंत गितेंची सूचना, "स्मार्ट सीटी'चे 31 कोटींचे व्याज मुख्यमंत्री निधीला द्या!

Sampat Devgire
गुरुवार, 23 एप्रिल 2020

महापालिकेच्या स्मार्ट कंपनीकडे केंद्र, राज्य शासन आणि महापालिकेने वर्ग केलेला विकासनिधीला जुलै, 2019 अखेर 31 कोटींचे व्याज मिळाले आहे.  कोरोना विरोधातील लढ्यात नाशिकचो योगदान म्हणून या व्याजातून शहरात उत्तम दर्जाचे विषाणूंशी संबंधीत रुग्णालय, प्रयोगशाळा आणि कक्ष उभारला जावा.

भाजप नेते वसंत गितेंची सूचना, "स्मार्ट सीटी'चे 31 कोटींचे व्याज मुख्यमंत्री निधीला द्या!
सरकारनामा ब्युरो

नाशिक ः महापालिकेच्या स्मार्ट कंपनीकडे केंद्र, राज्य शासन आणि महापालिकेने वर्ग केलेला विकासनिधी विविध आठ बॅंकांत ठेव म्हणून ठेवला होता. त्याला जुलै, 2019 अखेर 31 कोटींचे व्याज मिळाले आहे. ते अखर्चित आहे. सध्या कोरोना ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे कोरोना विरोधातील लढ्यात नाशिकचो योगदान म्हणून 31 कोटींच्या व्याजातून शहरात उत्तम दर्जाचे विषाणूंशी संबंधीत रुग्णालय, प्रयोगशाळा आणि कक्ष उभारला जावा. अथवा हा निधी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री निधीला वर्ग करावा अशी मागणी "भाजप'चे प्रदेश उपाध्यक्ष, माजी महापौर, माजी आणदार वसंत गिते यांनी केली आहे.

भारत सरकारने दिलेल्या 195.55 कोटींच्या अनुदानाच्या ठेवींवर 14.19 कोटी, महाराष्ट्र सरकारने दिलेल्या 97.75 कोटींच्या अनुदानावर 7.09 कोटी आणि महापालिकेने दिलेल्या त्यांच्या हिश्‍श्‍याच्या 99.77 कोटींच्या ठेवींवर दहा कोटी असे 31.28 कोटींचे व्याज जुलै, 2019 अखेर मिळाले आहे. त्यात गेल्या आठ महिन्यात सुमारे पन्नास टक्के वाढ झाली असावी असा अंदाज आहे. स्मार्ट सिटी कंपनीने विविध आठ बॅंकामध्ये या ठेवी ठेवल्या होत्या. त्यातून त्यांना हे व्याज मिळाले आहे. सध्या रिझर्व्ह बॅंकेने नुकतेच जाहिर केलेले धोरण आण त्यिात रेपो रेट कमी केल्याने आपोआपच व्याजाचे दर घटतील. त्यानंतर विकासकामांची गती मंदावेल. स्मार्ट सिटी कंपनीच्या सध्याच्या कामाचा वेग लक्षात घेता, सध्याच्या कोरोना संसर्गाच्या वातावरणामुळे आलेल्या मर्यांदांमुळे हा निधी खर्च होने अपेक्षीत आहे. दुसरीकडे महापालिकेच्या महसुलात घसरण अपेक्षीत आहे. त्यामुळे व्याजापोटी मिळालेल्या या निधीचा जनहितार्थ उपयोग हाच एकमेव मार्ग आहे.

"कोरोना'च्या संसर्गामुळे सगळीकडे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे "कोविड 19' हा नवीन विषाणू आहे. मात्र भविष्यातील दृष्टिकोण, अडचणींना सामोरी जाण्याची तयारी आधीपासून केली पाहिजे. त्यात स्मार्ट सिटी कंपनीला व्याजापोटी मिळालेल्या व्याजाचा निधी शहरासाठी स्मार्ट आरोग्य या संकल्पनेतून उत्तम, अद्ययावत रुग्णालय उभारण्यासाठी केला पाहिजे. महापालिकेकडे उत्तम रुग्णालये आहेत. त्यातील एखाद्या रुग्णालयाचे रुग्णालय, आयसोलेशन वॉर्ड आणि चाचणीसाठीची प्रयोगशाळा यासाठी व्हावा. त्यात अडचणी असल्यास शहरातील राज्य शासनाच्या संदर्भ रुग्णालयाचा एक मजला महापालिकेने दत्तक घ्यावा. येथे विषाणू सदृष्य आजारावरील तापसण्या, चाचण्या व उपचाराची अद्याधुनिक सुविधा उपलब्ध कारवी. त्यामुळे सबंध देशात नागीरकांच्या स्मार्ट आरोग्याचा विचार करणारी, त्यासाठी काम करणारी आणि राज्यात आधुनिक सेवा देणारे महापालिका म्हणून नाशिकचा नावलौकीक होईल.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख