शिवशाही बसमध्ये दिव्यांगांना सवलत द्या : धंनजय मुंडे 

शिवशाही बसमध्ये दिव्यांगांना सवलत द्या : धंनजय मुंडे 

मुंबई : दिव्यांगांना भाड्यात सवलत मिळावी तसेच त्यांना काही जागा आरक्षित असाव्यात या मागणीसाठी विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेदेखील उपस्थित होते. 

दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपंग व्यक्ती अधिनियम व सन चा सुधारित कायदा (आर. पी. डब्लू. डी.) केंद्र व राज्य सरकार राबवित आहे. या कायद्यान्वये महाराष्ट्रातील सुमारे 29 लाख दिव्यांग व्यक्तींना फायदा होऊ शकतो. त्यामुळे या कायद्यान्वये दिव्यांगांना शिवशाही बसमध्ये भाड्यात सवलत मिळावी तसेच त्यांना काही जागा आरक्षित असाव्यात या मागणीसाठी मुंडे यांनी रावतेंची मुंबई येथे भेट घेतली, विशेष म्हणजे सरकार याचा सकरात्मक विचार करेल असे आश्वासन दिवाकर रावतेंनी दिले. सदर भेट मंत्रालयात झाली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com