सरकार नव्हतं तेव्हा कुत्रंही येत नव्हतं, आता बदल्यांसाठी गर्दी होतेय - जयंत पाटलांची व्यथा

जो मतदार मला कधी भेटलेलासुद्धा नाही पण मला मते देतो.तो जर माझ्या दारात आला तर त्याला किमान दहा मिनिटं तरी वेळ द्यायला पाहिजे. तो राहिला बाजूला पण सरकारी कर्मचारीच आमच्याभोवती गर्दी करू लागले आहेत अशी व्यथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली
Half the Crowd Coming to me is for Seeking Transfers Say Jayant Patil
Half the Crowd Coming to me is for Seeking Transfers Say Jayant Patil

पुणे : "जो मतदार मला कधी भेटलेलासुद्धा नाही पण मला मते देतो.तो जर माझ्या दारात आला तर त्याला किमान दहा मिनिटं तरी वेळ द्यायला पाहिजे. तो राहिला बाजूला पण सरकारी कर्मचारीच आमच्याभोवती गर्दी करू लागले आहेत. मला भेटायला येणाऱ्या चारशे माणसापैकी किमान दोनशे लोक बदलीसाठी येतात." अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील मौजे डिग्रज येथील कार्यक्रमात बोलताना दिली.

"सगळा वेळ जर सरकारी कर्मचाऱ्यांना दिला तर जनतेला कधी वेळ देणार? आम्हाला राज्यातील चौदा कोटी जनतेने निवडून दिले आहे.त्यांच्यासाठी आम्हाला सरकार चालवायचे आहे."असेही पाटील म्हणाले. बदलीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून पाटील म्हणाले, "लगेच भाळून कोणालाही घेऊन येऊ नका. आपल सरकार नव्हतं त्यावेळी आपल्याकडे कुत्रंही येत नव्हतं.आता ही गर्दी कोठून येते काहीही समजत नाही."

"सकाळी आठपासून गर्दी होते ती रात्री बारा वाजेपर्यंत गर्दी असते. यात बदलीवाले लोक जास्त असतात. बदली करू या की पण आता अध्ये मध्ये  कशी बदली करायची?" असा सवाल यावेळी पाटील यांनी केला. "ज्यांनी आपल्याला सत्तेत आणले त्यांना आपल्याला वेळ द्यावा लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल आम्हाला आदर आहे पण आता बदलीच्या कामात वेळ घालवणे परवडणार नाही. ज्या जनतेने निवडून दिले आहे. त्या जनतेला वेळ दिला पाहिजे. जनतेला वेळ दिला नाही तर घरी जावे लागेल. कार्यकर्त्यांनी बदलीच्या बाबतीत गर्दी करू नये. लगेच भाळू नये.आपल सरकार नव्हतं तेव्हा कोणीही आपल्याकडं येत नव्हतं." असे पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com