haish salave sushama swaraj 1 rs fee | Sarkarnama

स्वराज यांनी 1 रूपयाची फी घेण्यासाठी घरी बोलविले होते : हरिष साळवे 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : "" कालरात्री 8 वाजून 45 मिनीटांनी सुषमा स्वराज यांच्याशी माझे बोलणे झाले होते. कुलभूषण जाधवप्रकरणातील एक रुपयाची फी घेण्यासाठी त्यांनी मला घरी बोलविले होते. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या निधनाचे वृत्त कानावर पडल्याने मला धक्काच बसला असे ट्‌विट ज्येष्ठ विधितज्ज्ञ हरिष साळवे यांनी केले आहे. 

स्वराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करतान साळवे यांनी म्हटले आहे, की सुषमा स्वराज या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या होत्या. कालच त्यांच्याशी माझे बोलणे झाले होते. त्यांनी मला एक रुपयाची फी घेण्यासाठी बोलविले होते. पण, ते जाऊ शकले नाही. कालरात्री त्यांचे निधन झाल्याने साळवे यांना धक्काच बसला. त्यांचे ह्दयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. 

हरिष साळवे हे प्रसिद्ध विधितज्ज्ञ असून सध्या पाकिस्तानच्या तुरूंगात असलेले भारतीय जवान कुलभूषन जाधव यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात साळवे भारताची बाजू मांडत आहेत. जाधव यांच्यासाठी वकीलपत्र घेतलेल्या साळवे यांनी कोणतीही फी घेण्यास नकार दिला आहे. स्वराज परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी या प्रकरणात मला केवळ फी म्हणून एक रूपया द्यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. 

हा एक रुपया घेण्यासाठी साळवे यांना स्वराज यांनी काल घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. तसे बोलणेही झाले होते पण, काही वेळाने स्वराज यांचेच निधन झाल्याने साळवे यांना मोठा धक्काच बसला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख