हडपसर आणि खडकवासल्यात राष्ट्रवादीकडे तिकिटासाठी गर्दी

हडपसर आणि खडकवासल्यात राष्ट्रवादीकडे तिकिटासाठी गर्दी

पुणे : पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघांतून राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी 52 जणांची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीची ताकद असलेल्या हडपसरमधून तब्बल तेरा जणांनी आणि खडकवासल्यातून सात जणांनी आपला मनोदय पक्षाकडे व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीसाठी अवघड समजल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये आठ जणांनी आपली नावे दिली आहेत.

पक्षाने 2009 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकलेल्या वडगाव शेरीत चार जणांची नावे आली आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे केवळ तीन जणांनी अर्ज भरले आहेत. पक्षाने प्रत्येक मतदारसंघातून इच्छुकांची नावे मागितली होती. यात एक माजी आमदार, तीन माजी महापौर यांचाही समावेश आहे. पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे हे हडपसरमधून इच्छुक आहेत. त्यांनी सर्व इच्छुकांचे अर्ज जमा करून घेतले. पण स्वतःचा अर्ज दाखल केलेला नाही.  

वडगाव शेरी मतदारसंघ
बापूसाहेब पठारे, सुनील टिंगरे, सतीश म्हस्के, सौ. तबस्सुम इनामदार, भीमराव गलांडे.

शिवाजीनगर मतदारसंघ
नीलेश निकम, प्रदीप देशमुख, बाळासाहेब रानवडे, दयानंद इरकल.

कोथरूड मतदारसंघ
बंडू केमसे, सौ. लक्ष्मी दुधाने, विजय डाकले, संदीप बालवडकर, माणिक दुधाने, बाळासाहेब बराटे, स्वप्निल दुधाने, गणेश घोरपडे.

खडकवासला मतदारसंघ
दत्ता धनकवडे, दिलीप बराटे, सचिन दोडके, सौ. रुपाली चाकणकर, काका चव्हाण, बाबा धुमाळ, सौ. भाग्यश्री कामठे.

पर्वती मतदारसंघ
अश्विनी कदम, संतोष नांगरे, नितीन कदम, शशिकांत तापकीर, अर्चना हनमघर, निखिल शिंदे.

हडपसर मतदारसंघ
लाला गायकवाड, अनिस सुंडके, सुरेश घुले, आनंद अलकुंटे, वैशाली बनकर, प्रवीण तुपे, प्रशांत जगताप, गफूर पठाण, बंडू गायकवाड, अशोक कांबळे, योगेश ससाणे, फारूक इनामदार, सौ.नंदा लोणकर.

पुणे कँटोन्मेंट मतदारसंघ
शांतीलाल मिसाळ, शैलेंद्र जाधव, अशोक कांबळे.

कसबा मतदारसंघ
गणेश नलावडे, रवींद्र माळवदकर, विशाल गजरे, वनराज आंदेकर, अशोक राठी, गोरख भिकुले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com