गुरुद्वारावरील हल्लेखोरांना दयामाया नाही : इम्रान खान

गुरुद्वारावरील हल्लेखोरांना दयामाया नाही : इम्रान खान

इस्लामाबाद: नानकाना साहिब गुरुद्वारावरील हल्ल्याच्या घटनेचा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज निषेध केला. ही घटना आपल्या दृष्टिकोनाला छेद देणारी असून, या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना सरकार कुठलीही दयामाया दाखविणार नाही, असेही इम्रान म्हणाले. 

नानकाना साहिब गुरुद्वारा हे शिखांचे पहिले धर्मगुरू गुरू नानक यांचे जन्मस्थान आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी नानकाना साहिब गुरुद्वारावर हिंसक जमावाने हल्ला करत दगडफेक केली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. 

या घटनेबाबत इम्रान यांनी आज पहिल्यांदाच वक्तव्य केले. नानकाना साहिब गुरुद्वारावरील हल्ल्याची घटना आणि भारतात सध्या मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर होत असलेल्या हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठा फरक आहे. गुरुद्वारावरील हल्लाची घटना माझ्या दृष्टिकोनाला छेद देणारी असून, त्यास जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधातील पोलिस आणि न्यायव्यवस्थेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत दयामाया दाखविली जाणार नाही, असे इम्रान यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. 

मोदींवरही टीकास्त्र 
इम्रान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीकास्त्र डागले. मोदींचा दृष्टिकोन अल्पसंख्याकांवरील अत्याचार आणि मुस्लिमांवरील हल्ल्यांचे समर्थन करतो. सरकारचे पाठबळ असलेले भारतीय पोलिस मुस्लिमांवर हल्ले करत आहेत, असा आरोप इम्रान यांनी केला. 

भारताकडून निषेध 
नानकाना साहिब गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला होता. तेथील शीख समुदायाच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी पाकिस्तान सरकारने तातडीने पावले उचलावित असेही भारताने म्हटले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com