पालकमंत्री झाल्या झाल्या गुलाबरावांनी गटसचिवांचा प्रश्न सोडविला!

जळगाव जिल्ह्यातील 428 गटसचिवांनी आपल्या थकित वेतनासाठी बेमुदत संप पुकारला होता.
gulabrao patil
gulabrao patil

जळगाव : शासनाने शेती कर्जमाफी जाहिर केली, अध्यादेशही काढला परंतु जळगाव जिल्ह्यात गटसचिवांचा संप सुरू असल्यामुळे शेती कर्जमाफीच्या याद्यात तयार नसल्यामुळे शेतकरी लाभापासून वंचित होते, मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्री नियुक्तीनंतर आज जळगावात प्रथम गटसचिवाचा संप मिटवून शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कामाला वेग दिला.

जळगाव जिल्ह्यातील 428 गटसचिवांनी आपल्या थकित वेतनासाठी बेमुदत संप पुकारला होता. त्यांच्या या संपामुळे शासनाने शेतकऱ्यांना जाहिर केलेल्या दोन लाख रूपये कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्याच्या याद्याचे काम ठप्प झाले होते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास विलंब होत होता. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदीही नियुक्ती करण्यात आली. आज सकाळी जळगाव येथे आल्यानंतर प्रथम त्यांनी अजिंठा विश्रामगृहात संपावर असलेल्या गटसचिव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्यानंतर त्याचे थकित वेतन अदा करण्यासाठी जिल्हा देखरेख संघाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले तसेच ताबडतोब दीड कोटी रूपयांची तरदूतही केली. त्यामुळे गटसचिवानी ताबडतोब संप मागे घेतला. गटसचिव सघटनेचे कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी सांगितले, कि मंत्री गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी केल्यामुळे आमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आमचा संप आम्ही मागे घेतला आहे.

शासनाच्या शेतीकर्जमाफीचा कार्यक्रम गटसचिवामार्फत राबविला जातो. त्यांच्या संपामुळे हे काम ठप्प झाले होते. जिल्हाधिकारी, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, व आपण स्वत: याबाबत चर्चा केली. त्यांचे थकित वेतन देण्याबाबत दीड कोटीची तरतूद केली. त्यामुळे त्यांनी संप मागे घेतला असून शेतकरी कर्जमाफीच्या यादया तयार करण्याचे काम आता सुरू झाले आहे.
-गुलाबराव पाटील  पालकमंत्री, जळगाव,
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com