देवकरांना पारोळा तालुक्‍यातून पंधरा हजारांचा लीड:आमदार डॉ.सतीश पाटील 

जळगाव लोकसभा मतदार संघात गेल्या वीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून येत आहे. परंतु यावेळी भाजपचा अपेक्षाभंग होणार आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर यावेळी निवडून येतील. पारोळा तालुक्‍यातून त्यांना तब्बल दहा ते पंधरा हजार मतांचा लीड राहिल, असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पारोळा एरंडोल मतदार संघाचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी व्यक्त केला आहे.
देवकरांना पारोळा तालुक्‍यातून पंधरा हजारांचा लीड:आमदार डॉ.सतीश पाटील 

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात गेल्या वीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून येत आहे. परंतु यावेळी भाजपचा अपेक्षाभंग होणार आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर यावेळी निवडून येतील. पारोळा तालुक्‍यातून त्यांना तब्बल दहा ते पंधरा हजार मतांचा लीड राहिल, असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पारोळा एरंडोल मतदार संघाचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

जळगाव लोकसभा निवडणूकीच्या निकालाबाबत ते म्हणाले, कीपारोळ्यासह तालुक्‍यात लीड मिळण्याचा भारतीय जनता पक्षाचा दावा आहे. मात्र तो किती फोल ठरणार आहे याचे चित्र निकालाच्या दिवशीच दिसून येणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर यांना तब्बल 15 हजाराचा लीड मिळेलच याची आम्हाला खात्री आहे. एरंडोल शहरात राष्ट्रवादीला कमी साथ मिळेल ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार आहे. जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे तसचे भाजपचे तब्बल ५७ नगरसेवक असल्याने आम्हाला त्या ठिकाणी कमी मताधिक्‍य मिळण्याची भीती होती. मात्र त्या मतदानाच्या दिवशी भाजपचे फारसे अस्तित्व दिसून आलेले नाही. त्यामुळे जळगाव शहरातही आमचे उमेदवार देवकर यांना चांगले मतदान मिळेल. एकदरींत जळगाव लोकसभा मतदार संघातील चित्र पाहता यावेळी भारतीय जनता पक्षाचा अपेक्षा भंग ठरेल आमदार उन्मेश पाटील यांचा पराभव करून गुलाबराव देवकर हमखास विजयी होतील याची आपणास खात्री आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com