गुजरात निवडणुकीत शिवसेनेचा फ्लॉप शो : उमेदवारांची अनामत रक्कम जप्त - Gujrat Shvisena Flop show | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

गुजरात निवडणुकीत शिवसेनेचा फ्लॉप शो : उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

सरकारनामा  
सोमवार, 18 डिसेंबर 2017

मुंबई  : गुजरात विधानसभेच्या सलग तिसऱ्या निवडणुकीतही शिवसेनेला खाते उघडता आले नाही. यंदाही शिवसेनेच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. 20 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार एक हजारपेक्षाही जास्त मते मिळवू शकलेले नाहीत.

मुंबई  : गुजरात विधानसभेच्या सलग तिसऱ्या निवडणुकीतही शिवसेनेला खाते उघडता आले नाही. यंदाही शिवसेनेच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. 20 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार एक हजारपेक्षाही जास्त मते मिळवू शकलेले नाहीत.

शिवसेनेने 2007 पासून गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यास सुरुवात केली. यंदा भाजपशी संबंध बिघडल्यामुळे या निवडणुकीतील शिवसेनेच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपचे माजी आमदार, बजरंग दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हरेश भट्ट यांना गोध्रा मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली होती. 

 त्यांच्यासह 50 उमेदवार शिवसेनेने मैदानात उतरवले होते. त्यांच्या प्रचारासाठी मंत्र्यांबरोबर आमदार आणि नगरसेवकांची फौज पाठवण्यात आली होती. तरीही शिवसेना खाते उघडू शकली नाही. या निवडणुकीत प्रचारासाठी अवघे 15 दिवस मिळाले होते. निकालाची चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असून यापुढे सतत काम करत राहू, असे शिवसेनेचे गुजरात राज्याचे संघटक हेमराज शहा यांनी सांगितले.

गुजरातमध्ये भाजप जिंकणारच होता. भाजपला अपेक्षित यश मात्र मिळालेले नाही. 22 वर्षांची सत्ता, 14 राज्यांचे मुख्यमंत्री, पैशांचा वापर, यामुळे हा निकाल अपेक्षितच होता, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. 
कॉंग्रेसकडे आम्ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पाहतो. देशातील वातावरण बदलत आहे. भाजप आणि कॉंग्रेस या दोघांचेही अभिनंदन करतो, असा चिमटाही त्यांनी काढला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख