मी नपुंसक नाही; मर्द आहे : हार्दिक पटेल  - Gujrat-election-Hardik-Patel | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

मी नपुंसक नाही; मर्द आहे : हार्दिक पटेल 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

"मी नपुंसक नाही; मर्द आहे,' अशा खणखणीत आवाजात सडेतोड उत्तर देऊन, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपला आजतरी गप्प केले आहे. 

पुणे : "मी नपुंसक नाही; मर्द आहे,' अशा खणखणीत आवाजात सडेतोड उत्तर देऊन, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपला आजतरी गप्प केले आहे. 

यू-ट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या हार्दिक पटेल यांच्याविषयीच्या कथित आक्षेपार्ह सीडीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. "भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासारखा दुसरा खेळाडू नाही,' असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या कथित सीडीमागे कोण आहे, हेच सूचवले आहे. 

या सीडीमध्ये एका हॉटेलच्या खोलीमध्ये तरुणीसोबत हार्दिक पटेल बोलत बसलेले दाखवलेले आहेत. हा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे गुजरातच्या राजकारणाने किती हीण पातळी गाठली आहे, याची प्रचिती सध्या येत आहे. हार्दिक पटेल, ओबीसींचे नेते अल्पेश ठाकोर आणि दलितांचे नेते जिग्नेश मेवाणी यांनी भाजपला नाकीनऊ आणले आहे. त्यातच ही व्हीडीओ समोर आल्याने गुजरातच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या सीडीचीच चर्चा गुजरातसह देशभर कालपासून सुरू आहे. 

हार्दिक पटेल यांनी तत्काळ यू-ट्यूबकडे धाव घेऊन कथित व्हीडीओ हटवण्यास सांगितले आहे. कायदेशीर कारवाईबाबत सल्ला घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी काल सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

प्रसिद्ध झालेली सीडी बनावट असल्याचे सांगून ते म्हणाले, की वैयक्तिक आरोप करून केवळ मला बदनाम करण्यासाठीच हा कट रचण्यात आला आहे. मी लग्न करणारच आहे. मी नपुंसक नाही; मर्द आहे. मी बिलकुल मर्द आहे. बिलकुल मर्द आहे. यापुढे अजूनही अशा प्रकारच्या बदनाम करणाऱ्या सीडी येतील. सभा घेण्यापासून परावृत्त करण्यासाठीची ही खेळी आहे. जनतेपासून मला दूर करण्यासाठी चाललेले हे प्रयत्न आहेत. परंतु, गुजरातची जनता मुर्ख नाही; ती समझदार आहे. मी आजच न्यायलयात गेलो होतो. तेथेही लोकांची गर्दी झाली होती. मी चुकलो तर जनताच मला दूर करेल. 

पाटीदार आरक्षणाविषयी एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी समाजाच्या विविध संघटनांबरोबर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख