पैशांअभावी गुजरात काँग्रेस कंगाल - संजय निरुपम - Gujrat Congress Has no money Sanjay Nirupam | Politics Marathi News - Sarkarnama

पैशांअभावी गुजरात काँग्रेस कंगाल - संजय निरुपम

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

पैशा अभावी गुजरात काँग्रेस कंगाल आहे. आम्ही तेथे जाऊन त्यांच्यावर जाऊन आर्थिक बोजा  टाकू शकत नाही,तर आम्ही आमच्या पद्धतीने तेथे जाऊंन प्रचार करुन काँग्रेसला विजयी करू, असे प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी येथे केले. मुंबई येथील मुरली देवरा सभागृहात गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.

मुंबादेवी : पैशा अभावी गुजरात काँग्रेस कंगाल आहे. आम्ही तेथे जाऊन त्यांच्यावर जाऊन आर्थिक बोजा  टाकू शकत नाही,तर आम्ही आमच्या पद्धतीने तेथे जाऊंन प्रचार करुन काँग्रेसला विजयी करू, असे प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी येथे केले. मुंबई येथील मुरली देवरा सभागृहात गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.

निरुपम म्हणाले, "अखिल भारतीय काँग्रेस समिति आणि गुजरात प्रभारी अशोक गहलोत यांच्या आदेशाने मुंबई काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी दक्षिण गुजरात (महाराष्ट्र राज्याच्या लगतचा असलेला गुजरात राज्याचा भाग) येथील 30 विधानसभा जागांवरील वरील काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करुन त्यांना विजयी करणार आहेत.''

निरुपम पुढे म्हणाले, "गुजरात मधील जनता भाजपाच्या खोट्या आश्वासनांमुळे प्रचंड दु:खी आहे. मतदान प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याच्या नामांकन भरण्याच्या नंतर केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाने मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गुजरात मध्ये प्रचारास जातील," काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव घेऊन निरुपम म्हणाले, "त्यांचा आदेश आहे की प्रचारासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी लोकांशी संवाद साधत हात जोडत काँग्रेस ला मते देण्याची विनंती करावी.
महाराष्ट्राला लागून असलेले गुजरात मधील विधानसभा क्षेत्र बलसाड, भरुच आणि सूरत येथे हे कार्यकर्ते प्रचार करतील,"

"मुंबईतुन जाणाऱ्या महिला कार्यकर्त्यां साठी नवसारी येथे एका बंगल्यात व्यवस्था करण्यात  येणार आहे. हा बंगला महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुशीबेन शहा यांचा आहे.सुशीबेन यांनी सर्व महिलाना राहण्यासाठी माझा बंगला देईन असे कबुल केले आहे," असेही निरुपम यांनी सांगितले.

"गुजरात प्रचारास जाणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने तेथे जावे. मागील दोन दशकांपासून काँग्रेस गुजरातेत विरोधी पक्षात आहे. तेथील काँग्रेस फारच दयनीय स्थितीत असून बऱ्याच मुश्किलिने इकडून तिकडून पैसे जमवून निवडणूक लढवित आहे. मुंबईतुन जाणाऱ्या कार्यकर्त्यांची फक्त राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. गुजरात मध्ये कसेही करुन काँग्रेसची सत्ता आलीच पाहिजे. येथूनच काँग्रेस च्या सत्तेचा शुभारंभ झाल्यास देशात काँग्रेसची सत्ता येऊन राहुल गांधी पंतप्रधान होतील." असेही निरुपम यांनी सांगितले. या वेळी व्यासपीठावर माजी खासदार एकनाथ गायकवाड़, सचिन सावं उपेन्द्र दोषी, नैना शाह, चरणसिंग सप्रा आणि भूषण पाटील उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख