Gujrat Atomic Energy plant afffected by Small Pox virus | Sarkarnama

गुजरातमधील अणुप्रकल्पाला "देवीची बाधा'

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मार्च 2017

जलप्रकल्पांमध्ये गळती शोध प्रणाली आहे. मात्र 11 मार्च 2016 रोजी झालेल्या गळतीबाबत इशारा देण्यात ही यंत्रणा कुचकामी ठरली. गळतीच्या काही आठवड्यानंतर नळ्यांना चार मोठी छिद्रे पडल्याचे निदर्शनास आले. ज्यामधून गळती झाल्याचे दिसत होते.

मुंबई - गुजरातमधील काक्रापार अणुप्रकल्पामधील किरणोत्सर्ग प्रतिरोधक नळ्यांना देवीची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. चित्रपटांमधील रहस्यमयी कथांनी प्रभावित झालेल्य शास्त्रज्ञांप्रमाणे काक्रापार अणुप्रकल्पामधील शास्त्रज्ञांनी रहस्यमय अणुगळती शोधण्याकरीता मध्यरात्री तेल जाळून देवीच्या बाधेचा शोध लावला.

काक्रापार येथील अणुउर्जा प्रकल्पातील बॉयलरची एक बाजू बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांच्या मालमत्तेला लागून आहे. काही काळापूर्वी राज कपूर येथे राहत असत. दक्षिण गुजरातमधील या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या निरीक्षकांनी जोपर्यंत या प्रकल्पामधील गळती निदर्शनास येत नाही , तोपर्यंत प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. अणुप्रकल्पांमधील नळ्या या दुर्मिळ धातूंच्या बनलेल्या आहेत. या नळ्यांना देवीसदृष्य विषाणूचा संसर्ग होऊन तो नळ्यांमध्ये सर्वत्र पसरला असल्याचे निदर्शनास आले.

एका वर्षाच्या तपासानंतरही गळती सापडत नव्हती, तर देवीसदृश्‍य विषाणूंमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत चालली होती. शास्त्रज्ञांना कळत नव्हतं नक्की काय घडतंय. 11 मार्च 2016 च्या भल्या सकाळी काक्रापूर प्रकल्पाला पाण्याची गळती सुरू झाली आणि प्रकल्प तातडीने बंद करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे भारतीय अणुउर्जा विभागाने सांगितले. अणुप्रकल्पाला सुरक्षितपणे बंद करण्यात आला असून कोनतीही अणुगळती झाली नसल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

अणुप्रकल्पाची रहस्यमयी कथा आता नव्या वळणावर येत होती. अणुप्रकल्पाला जर गळती लागली तर गळती इशारा यंत्रणेने कोणताही सिग्नल कसा दिला नाही, हा प्रश्‍न अनेकांना पडला. याबाबत बोलताना अणु उर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष एस.ए.भारद्वाज म्हणाले की, जलप्रकल्पांमध्ये गळती शोध प्रणाली आहे. मात्र 11 मार्च 2016 रोजी झालेल्या गळतीबाबत इशारा देण्यात ही यंत्रणा कुचकामी ठरली. गळतीच्या काही आठवड्यानंतर नळ्यांना चार मोठी छिद्रे पडल्याचे निदर्शनास आले. ज्यामधून गळती झाल्याचे दिसत होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख