Gudhde should inrospect | Sarkarnama

गुडधेंनी आपला चेहरा पाहावा विकास ठाकरेंचा पलटवार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 मार्च 2017

गुडधे यांनी निवडणुकीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या छायाचित्रांचे वापर केले होते. गुडधेंची प्रतिमा एवढी चांगली आहे तर त्यांनी कॉंग्रेस नेत्यांचे फोटो कां वापरले? असा सवाल ठाकरे यांनी केला. 

नागपूर: नागपूर महापालिकेतील कॉंग्रेसच्या पराभवाला अनेक कारणे असून चेहरा नाही, असे म्हणाऱ्यांनी आपला चेहरा आरशात पाहावा, असा पलटवार नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेतेपदी निवड न झाल्याने नाराज झालेल्या विनोद गुडधे पाटील यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे व ज्येष्ठ नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. ज्येष्ठ नेत्यांनी कॉंग्रेसमधील पद सोडावे, अशी सूचना त्यांनी केली होती. पराभवाचे विश्‍लेषण करताना शहर कॉंग्रेसला चेहरा नसल्याचा हल्लाबोल गुडधे पाटील यांनी केला होता. ठाकरे यांनी गुडधे यांचे आरोप फेटाळून लावले. गुडधे यांनी निवडणुकीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या छायाचित्रांचे वापर केले होते. गुडधेंची प्रतिमा एवढी चांगली आहे तर त्यांनी कॉंग्रेस नेत्यांचे फोटो कां वापरले? असा सवाल ठाकरे यांनी केला. 

निवडणुकीनंतरही कॉंग्रेसमधील मतभेद संपलेले नसल्याचे स्पष्ट झाले. विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांच्या पदग्रहण समारंभात कॉंग्रेसचे केवळ 12 नगरसेवक हजर होते. यावरून अर्ध्यापेक्षा अधिक नगरसेवकांचा महाकाळकर यांना समर्थन नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख