सांगलीचे पालकमंत्रीपद कॉंग्रेसकडे हवे होते : डॉ. विश्‍वजित कदम

महापुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष पॅकेज देण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली जाणार आहे.
vishwajeet_ kadam
vishwajeet_ kadam

सांगली :  "जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कॉंग्रेसकडे असावे, अशी माझी इच्छा होती. मात्र तीन पक्षांच्या सरकारमध्ये निर्णय घेताना कसरत होते. कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून इच्छुक होतो, अशी चर्चा आहे. त्यात तथ्य नाही. सांगलीबाबत जो आघाडीतील घटक पक्षांनी निर्णय घेतला तो मान्य आहे. भंडाऱ्याची जबाबदारी दिल्याने पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यांच्यात समन्वय साधण्याचे काम करु.''   असे   कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले . 


  जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री डॉ. कदम यांची आढावा बैठक झाली. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली.   


  डॉ. कदम म्हणाले,"ऑगष्ट 2019 मध्ये आलेल्या महापुराने सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. सरकारकडून मदत मिळाली. मात्र, अद्यापही शेती, रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. महापुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष पॅकेज देण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली जाणार आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे महापुराने प्रचंड नुकसान झाले. त्या काळातील मदत तोकडी आहे."


डॉ. कदम म्हणाले,"शेती, घरं आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. अद्यापही मदतीची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष पॅकेज देण्याचे आश्वासन दिले आहे. महापुराच्या कालावधीत ब्रम्हनाळ घटना घडली होती. अनेकांना प्राण गमवावा लागला, भविष्यात पूरस्थितीचा सामना करावा लागणार नाही, याबाबतची दक्षता घेतली जात आहे."


'' जिल्हाधिकाऱ्यांनी उपाययोजनांबाबत अहवाल तयार केला असून तो शासनाला सादर केला आहे. मॉन्सूनचे चक्र बदलले असल्याचे स्पष्ट झाले आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन तयारी करावी लागेल. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तत्कालीन सरकारने पाच वर्षात अनावश्‍यक योजनांसाठी खर्च केला. महाविकास आघाडीपुढे अनेक अडचणी आहेत. मात्र तीन पक्षांचे असलेले महाविकास आघाडीचे सरकार लोकांसाठी प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहिल,'' असेही त्यांनी सांगितले . 

'एफआरपी' साठी 28 रोजी बैठक

राज्यातील साखर कारखाने सुरु होवून दोन महिने झालेत. ऊसाच्या एफआरपीचा प्रश्न प्रलंबित आहेत. महापूर, दुष्काळामुळे ऊसाचे उत्पादन घटले. उताराही कमी झाला. कारखाने आर्थिक अडचणीत असल्याने एफआरपीचा प्रश्न प्रलंबित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 28 रोजी मुंबईत बैठक होत आहे,  असेही विश्वजीत कदम यांनी सांगितले  . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com