पालकमंत्री अशोक चव्हाण नांदेडला ठाण मांडून

कोरोनाला रोखण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण मागील १५ दिवसांपासून नांदेडला ठाण मांडून असून, जिल्हा प्रशासन देखील रात्रंदिवस कामात व्यस्त आहे. सुदैवाने जिल्ह्यात आजवर एकही रूग्ण सापडलेला नसून, कोरोनाला हरविण्यासाठी नागरिकांनी देखील शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी केले आहे.
guardian minister ashok chavan works in nanded since last two weeks to fight coronavirus
guardian minister ashok chavan works in nanded since last two weeks to fight coronavirus

नांदेड - कोरोनाला रोखण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण मागील १५ दिवसांपासून नांदेडला ठाण मांडून असून, जिल्हा प्रशासन देखील रात्रंदिवस कामात व्यस्त आहे. सुदैवाने जिल्ह्यात आजवर एकही रूग्ण सापडलेला नसून, कोरोनाला हरविण्यासाठी नागरिकांनी देखील शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी केले आहे.

जगभरातच कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेले रूग्ण अजून तरी आढळून आले नाहीत. जिल्ह्यातील परिस्थिती अशीच नियंत्रणात रहावी, यासाठी पालकमंत्री चव्हाण दररोज जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर व इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकी घेत आहेत. तसेच मुख्यमंत्री व इतर प्रमुख मंत्र्यांच्या ते नियमित संपर्कात आहेत.

नांदेड जिल्ह्यात १५ मार्चपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणायला सुरूवात झाली होती. कोरोनामुळे स्थलांतर होऊन बाहेगावाहून सुमारे ४८ हजार नागरिक नांदेड जिल्ह्यात आले. त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना घरातच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सोडून इतर सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या. 

सर्व प्रकारच्या अनावश्यक वाहतुकीवर बंदी घातली गेली. अत्यावश्यक वस्तुंच्या वाहतुकीसाठी पासेस देण्याची व्यवस्था करण्यात आली. राज्याची व जिल्ह्याची सीमा बंद झाली. किराणा, दूध, भाजीपाला, औषधी आदींचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला.

जिल्ह्यात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले. प्रशासनाच्या मदतीसाठी तीनशे होमगार्ड उपलब्ध करून देण्यात आले. नागरिकांची अडचण होऊ नये, म्हणून विविध मदतकार्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले. २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कामगार, कष्टकरी आदींच्या अन्नधान्य व भोजनाची सोय स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com