मोबाईल फोनवरील जीएसटी कर १८ टक्क्यांवर 

जीएसटी परिषद बैठक : कापड, पादत्राणे आणि खतांवरील करात बदल नाही
मोबाईल फोनवरील जीएसटी कर १८ टक्क्यांवर 

नवी दिल्ली  : जीएसटी परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत मोबाईल फोनवरील जीएसटी कर १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर नेण्यात आला आहे; तर सेवा क्षेत्रातील देखभाल, दुरुस्तीशी निगडित यंत्रणांवरील जीएसटी कर मात्र ५ टक्केच ठेवून त्यांना पूर्ण इनपुट टॅक्स क्रेडिट देण्यात आले.

त्याचबरोबर जीएसटी परिषदेने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीच्या जीएसटी९आर आणि जीएसटीआर९सी साठीचे विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवली आहे. 

ज्या करदात्यांची वार्षिक उलाढाल ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना हे विवरणपत्र भरणे बंधनकारक असेल. याआधी वार्षिक उलाढाल २ कोटी रुपये असणाऱ्या करदात्यांना विवरणपत्र भरण्याचे बंधनकारक होते आणि त्यासाठीची मुदत ३१ मार्च ही होती.

देशाची अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे आणि कोरोना विषाणूच्या फैलावाचा विपरीत परिणाम विविध क्षेत्रांवर झाल्यामुळे खते आणि पादत्राणांवरील जीएसटी कर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून खते आणि पादत्राणांवरील जीएसटी कर वाढवण्याची मागणी होते आहे.

जीएसटी नेटवर्कच्या संदर्भात असलेल्या अडचणींवर इन्फोसिसच्या नंदन निलेकणी यांनी सविस्तर मांडणी केली. निलेकणी यांनी जीएसटी परिषदेत जीएसटी नेटवर्कमधील सर्व त्रुटी जानेवारी २०२१ पर्यंत दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com