एप्रिलपासुन जीएसटीची सुधारित आवृत्ती येणार : निर्मला सीतारामन

नव्या आर्थिक वर्षापासून जीएसटीटी सुधारित आवृत्ती येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केली. सीतारामन यांनी सन २०२० -२०२१ चा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला त्यावेळी त्या बोलत होत्या
GST in new form from April Announces Nirmala Sitaraman
GST in new form from April Announces Nirmala Sitaraman

नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षापासून जीएसटीटी सुधारित आवृत्ती येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केली. सीतारामन यांनी सन २०२० -२०२१ चा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ''मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करावी लागेल. कृषी क्षेत्रासाठी १६ सूत्रीय योजना अंमलात येईल. शेतीसाठी सौरऊर्जा वापरासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचवण्यात यश आले आहे. केंद्र सरकारच्या करबोजात ४८.७ टक्क्यांनी घट झाली आहे.  शेती, ग्रामविकास, सिंचन हे मुद्दे केंद्रस्थानी
 आहेत. २०२२पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आमचे लक्ष्य आहे. घराघरात पिण्याचं पाणी पोहोचल आहे.  २००६-१६ दरम्यान मोठे दारिद्र्य निर्मूलन झाले. २७ कोटी जनता द्रारिद्र्य रेषेहून वर आली. अर्थसंकल्पात गरीबांसाठी खास योजना आहेत. विविध प्रकारच्या पेन्शन योजना लवकरच नागरिकांना मिळणार आहेत,''

त्या पुढे म्हणाल्या, "हिंदुस्थानात डिजीटल क्रांती झाली. आपल्याला अर्थव्यवस्थेला बळकटी द्यायची आहे. एप्रिल २०२० पर्यंत जीएसटी आणखी सोपा होईल. आरोग्य, शिक्षण, नोकरी हे मुद्दे केंद्रस्थानी  आहेत. हिंदुस्थान ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यास सरकारला यश आले आहे.  प्रधानमंत्री आवास योजना उत्तम प्रकारे राबवली गेली.  वस्तुंवरील कर घटल्याने लघु आणि मध्यम उद्योगांना फायदा मिळाला.
बँकांची स्थिती मजबूत झाली, करदात्यांची संख्या वाढली.  त्याचा फायदा देशाला मिळेल.  जीएसटीमुळे प्रतिमास ४ टक्के इतकी बचत वाढली आहे. जीएसटीमुळे करारांचे जाळे संपुष्टात आले. जीएसटीमुळे एकच टॅक्स लागू झाला,"

प्रमुख मुद्दे
 

२०२५पर्यंत दुग्धउत्पादन दुप्पट करण्याचं लक्ष्य

शेतकऱ्यांसाठी १५ लाख रुपये कर्जाची तरतूद

गावस्तरावर गोदामांची निर्मिती

जिल्हास्तरावर फळबागा विकासासाठी प्रोत्साहन देणार

सेंद्रीय शेतीवर भर देणार

झिरो बजेट शेतीवर सरकारचा भर

महिला बचत गटांना प्रोत्साहन देणार

६.११ कोटी शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ

शेतकरी महिलांसाठी सरकारची विशेष योजना

दूध, मांस आणि मासे यांच्या वाहतुकीसाठी किसान रेल योजना

धनलक्ष्मीला धान्यलक्ष्मी करण्याचा उद्देश

शेतांमध्ये योग्य दर्जाचे खत आणि शुद्ध पाणी यांवर लक्ष केंद्रित करणार

रासायनिक खतांचा वापर टाळण्याचा प्रयत्न करणार

ग्राम भंडार योजना स्वयंसहाय्यता गटांतर्फे गावागावांत पोहोचवणार

पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सिंचन योजना

पारंपरिक ऊर्जास्रोतांकडून सौर ऊर्जास्रोताकडे वळण्याचे लक्ष्य

अन्नदात्याला ऊर्जादाता बनवण्याचा प्रयत्न करणार

नापिक जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्पाचा विचार

दुष्काळग्रस्त १०० गावांमध्ये काम करणार

सौरऊर्जेवर पंप सुरू केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com