प्रभाकर देशमुखांचे आता ग्रीन माणदेश

 प्रभाकर देशमुखांचे आता ग्रीन माणदेश

मलवडी (जि.सातारा) : ग्रीन माणदेश हे आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी झाडे लावून ते जगविण्याचा आपण विडा उचलूया. शाश्वत विकासाच्या दिशेने सुरु असलेल्या माणच्या वाटचालीमध्ये ग्रीन माणदेश हे महत्वाचे पाऊल आहे, असे मत माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले. 

माण-खटाव तालुके हरित बनवून दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी 'ग्रीन माणदेश' ह्या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व संवर्धन कार्यशाळा आज दहिवडी येथील डी. एस. पाटील सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. 

श्री देशमुख म्हणाले, झाडे लावताना त्यांचे पर्यावरण दृष्ट्या महत्व समजून उमजून लावावीत. पाणी आणी झाडं हे आपलं भविष्य उज्वल करु शकतात. जलयुक्त शिवार ही माझ्या आयुष्यातील महत्वपुर्ण योजना आहे. या योजनेत माण-खटावमध्ये अभिमान वाटावं असं काम झालं आहे. महाराष्ट्रसह माणचं नशिब बदलणारं हे काम आहे. ग्रीन माणदेश योजनेत आम्ही झाडं उपलब्ध करुन देणार आहोत. त्याची जोपासना ग्रामस्थांनी करायची आहे. 

पर्यावरण तज्ञ महेश गायकवाड म्हणाले,जलसंधारणाची खुप कामे झाली आहेत. आता गरज आहे ती वृक्षारोपणाची. त्यापूर्वी चराईबंदी करुन गवत वाढविण्याचा प्रयत्न करावा. ग्रीन माणदेश हा उपक्रम सक्षमपणे राबविला तर नक्कीच माणचा चेहरामोहरा बदलेल. वनक्षेत्रपाल एस. के. पाटील म्हणाले, एक जुलैपासून तेरा कोटी वृक्ष लागवड हा उपक्रम सुरु होत आहे. जलसंधारणाची कामं केली तरी वृक्षारोपण केल्याशिवाय पर्याय नाही. 

यावेळी उपसचिव डॉ. प्रमोद शिंदे, ड्रीम सोशल फाऊंडेशनच्या हर्षदा जाधव-देशमुख, वन क्षेत्रपाल एस. के. पाटील, सामाजिक वनीकरणच्या वन क्षेत्रपाल कौसल्या भोसले, देवराईचे महाराष्ट्र समन्वयक योगेश गायकवाड, किरकसालचे सरपंच अमोल काटकर, तहसिलदार दशरथ काळे, माजी सभापती श्रीराम पाटील, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर व तानाजी कट्टे, माजी उपसभापती वसंतराव जगताप, भाजपचे माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, जैन संघटनेचे भरतेशशेठ गांधी, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

ग्रीन माणदेशसाठी एक ऍप विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून देणगीदाराला त्याने दिलेल्या देणगीतून परसबागेत लावलेल्या रोपांची माहिती घरबसल्या समजणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com