यवतमाळमध्ये ग्रामपंचायतींच्या पुन्हा 'हायव्होल्टेज' निवडणुका; सदस्यांतून सरपंच निवडीने रंगत

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील 462 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे
avatmal Grampanchayt Elections on Card
avatmal Grampanchayt Elections on Card

यवतमाळ : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील 462 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील 519 ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यावेळी सदस्यांमधून सरपंचाची निवड होणार असल्याने पुन्हा गावातील निवडणुका 'हाय व्होल्टेज' होण्याची शक्‍यता आहे.

ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळेच या निवडणुकीला अधिक महत्त्व आहे. गावातील राजकारणावर आपली पकड राहावी, यासाठी या निवडणुका प्रतिष्ठेची केली जातात. युती सरकारने सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काही प्रमाणात चुरस कमी झाली होती. आता महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलला आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे रंगतदार होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात एक हजार 208 गामपंचायती आहेत. त्यातील तब्बल 981 ग्रामपंचायतीच्या निवडणुका या 2020 या वर्षांत होणार आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 462 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या 14 फेब्रवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत. यासाठी आवश्‍यक असलेली प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील 519 ग्रामपंचायतींची रणधुमाळी होणार आहे. 

या टप्प्यातील ग्रामपंचायतींचे वॉर्ड आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी येणाऱ्या काळात होणार आहे. त्यामुळे आता गावपुढारी निवडणुकीसाठी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत. सदस्यांमधून सरपंच निवडले जाणार असल्याने पुन्हा एकदा "हाय व्होल्टेज' लढतीचे चित्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिसणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com