grampanchayat election | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

ग्रामपंचायतींसाठी  23 सप्टेंबरला मतदान 

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई : विविध जिल्ह्यांतील ऑक्‍टोबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सोमवारी (ता. 21) येथे केली. 

सहारिया यांनी सांगितले, की संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत सुटीचा दिवस वगळून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 23 सप्टेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ दुपारी तानपर्यंतच असेल. सर्व ठिकाणी मतमोजणी 25 सप्टेंबरला होईल. 

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी : पालघर- 8, नाशिक- 22, नंदुरबार- 1, अहमदनगर- 8, पुणे- 1, औरंगाबाद- 4, नांदेड- 4, उस्मानाबाद- 1, जालना- 40, हिंगोली- 13, यवतमाळ- 7, चंद्रपूर- 4 आणि गडचिरोली- 1. एकूण- 114. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख