grampanchayat | Sarkarnama

ग्रामपंचायत निवडणुकीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे

तुषार खरात : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई : ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याचे अधिकार सध्या संबंधित जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे आहेत. पण त्यांच्याकडील हे अधिकार काढून आता जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून हे अधिकार काढून घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आदेश केले होते. त्यानुसार सरकारने हे आदेश जारी केल्याचे सूत्रांनी "सरकारनामा"ला सांगितले. 

सन 2012 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यापूर्वी हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडेच होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायती अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडेच आहेत. पण सन 2012 पासून ग्रामपंचायत निवडणुकीचे अधिकार अपर जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या या अधिकारात जिल्हाधिकाऱ्यांना कसलाही हस्तक्षेप करता येत नव्हता. राजकीय पुढाऱ्यांमार्फत अपर जिल्हाधिकाऱ्यांना मॅनेज करणे शक्‍य होऊ शकते, असा संशय आल्यानेच त्यांच्याकडील अधिकार काढून घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख