'पदवीधर-शिक्षक'साठी मतदार नोंदणी 9 डिसेंबरपर्यंत करता येणार

'पदवीधर-शिक्षक'साठी मतदार नोंदणी 9 डिसेंबरपर्यंत करता येणार

नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विहीत कार्यपध्दतीनुसार निकाली काढणेस पात्र असलेले सर्व दावे निकाली काढून पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. -डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी दि. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत संधी मिळणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी (पदवीधर, शिक्षक मतदार संघ पुणे विभाग) डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. 

पत्रकात म्हटले आहे, भारत निवडणूक आयोगाने दि. 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत दि. 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत दावे व हरकत स्वीकारण्यात आले आहेत. सदर कार्यक्रमांतर्गत दि. 23 नोव्हेंबर 2019 ते दि. 9 डिसेंबर 2019 या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून दि. 30 डिसेंबर 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर निरंतर मतदार नोंदणी चालू राहणार असून त्याअंतर्गत नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विहीत कार्यपध्दतीनुसार निकाली काढणेस पात्र असलेले सर्व दावे निकाली काढून पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com