बंगल्यांसाठी भांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेते दरेकरांना बंगला नाकारला

...
बंगल्यांसाठी भांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेते दरेकरांना बंगला नाकारला

पुणे : खातेवाटपाबरोबरच बंगल्यांसाठी भांडणाऱ्या नव्या सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याचा हक्काचा बंगला न देता मंत्रालयापासून दूर असलेली सदनिका देण्यात आली आहे. या बाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नापसंती व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेत्याला अशा प्रकारे डावल्याचे उदाहरण यापूर्वी घडलेले नाही, असेही सांगण्यात येत आहे.

सत्ताधारी मंत्र्यांबरोबरच विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांना मंत्रालयाजवळचा बंगला देण्यात येतो. सामान्या लोकांना विरोधी पक्षनेत्यांना भेटता यावे तसेच मंत्रालय व विधीमंडळातील कामकाजाच्या दृष्टीने सोयीसाठी विरोधी नेत्यांना जवळचे बंगले देण्यात येतात.

मात्र, दरेकरांना बंगला नाकारून सरकारने नवी परंपरा मोडीत काढली आहे. मागील सरकारच्या काळातील विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मंत्रालयासमोरील मोक्‍याचा बंगला देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर नव्या सरकारने बंगला काढून घेतल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बंगल्याच्या बदल्यात दरेकर यांना मलबार हिल येथील अवंती इमारतीतमधील सदनिका देण्यात आली आहे.

या संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले, "" बंगला असो व सदनिका यामुळे मला वैयक्तिक अडचण कोणतीच नाही. मात्र, मला भेटण्याठी येणाऱ्या सामान्य माणसाची अडचण होणार आहे. सामान्य माणसाची अडचण व्हावी, अशी सरकारची इच्छा असावी''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com