govt mocks education : AJit pawar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

सरकारने शिक्षणाचा विनोद केला : अजित पवार यांची टीका

ज्ञानेश्वर रायते
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018

बारामती : शिक्षणक्षेत्रातील अनेक प्रश्न प्रलंबित ठेवून राज्य सरकारने शिक्षणाचाच "विनोद' केला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली. 

स्वराज्य शिक्षक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या अधिवेशनात राज्यभरातील आश्रमशाळांमधील 73 गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक आमदार विक्रम काळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्वप्नील ढमढेरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उद्योजक उत्तम फडतरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, संयोजक फत्तेसिंह पवार उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""सरकारने विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवले. आश्रमशाळांसाठी रोज एक नवीन शासन आदेश निघतो. आश्रमशाळा सरकारला बंद करायच्या आहेत, असेच दिसते. राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही. या सरकारने शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले आहे.'' 

या वेळी विक्रम काळे यांच्यासह इतर वक्‍त्यांनी सरकारच्या धोरणावर टीका करीत प्रलंबित प्रश्नांविषयी चर्चा केली. जुनी पेन्शन हक्क योजना, अतिरिक्त शिक्षक समायोजन, विनाअनुदानित शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न आणि राज्य सरकारची उदासीनता यामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबविण्याची गरज या वेळी सर्वांनी व्यक्त केली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख