फडणविसांनी केलेल्या सहकारातील नियुक्त्या रद्द करण्याच्या हालचाली

...
फडणविसांनी केलेल्या सहकारातील नियुक्त्या रद्द करण्याच्या हालचाली

सोलापूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यावर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्‍त्या रद्द करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सूचना केल्या आहेत. या नियुक्‍त्या रद्द करून तत्काळ अहवाल पाठवावा, अशा सूचना सहकार आयुक्तांनी संबंधितांना दिल्या आहेत.

नोव्हेंबर 2014 ते ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत सहकारी संस्थांवर झालेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्‍त्या करण्याबाबत आता सरकारने पावले उचलली आहेत. राज्याचे सहकार व पणनमंत्री जयंत पाटील यांनी 21 डिसेंबरला सहकार विभागाला सूचना केल्या होत्या.

त्यानुसार सहकार विभागाने 30 डिसेंबर रोजी राज्याच्या सहकार आयुक्तांना याबाबतच्या सूचना केल्या आहेत. सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांना याबाबतच्या सूचना केल्या आहेत. भाजपच्या काळात राज्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी बॅंका, सहकारी दूध संघ यावर अशासकीय सदस्यांच्या तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्‍त्यांच्या बाबतीतही सहकार विभाग काय कार्यवाही करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पणनच्या नियुक्‍त्यांकडे लक्ष
सहकार आयुक्तांनी याबाबतचे पत्र काढले असून पणनच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील बाजार समित्यांतील अशासकीय सदस्यांच्या बाबतीत काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूरसह जवळपास सर्वच बाजार समित्यांवर अशासकीय सदस्यांच्या तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्‍त्या करण्यात आलेल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com