Govt has money to build towers | Sarkarnama

बुर्ज खलीफाच्या इमारतीत शेतकरी राहणार काय?

संपत देवगिरे
मंगळवार, 18 एप्रिल 2017

आपल्याकडील शेतक-यांची स्थिती खुप बिकट आहे व ते सतत कर्जमाफीची मागमी करीत आहेत. त्यामुळे ताबडतोब कर्जमाफी करावी. अन्यथा अतिशय तीव्र स्वरुप पुढच्या टप्प्यात सघर्ष यात्रेला मिळेल. त्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल.- अबू आझमी

नाशिक - आज शेतक-याचे जगणे मुश्कील झाले आहे. मात्र, मुख्यमंत्री मुंबईत दुबईच्या बुर्ज खलीफापेक्षा उंच टाॅवर बांधण्याची भाषा करतात. टाॅवरसाठी सत्तर हजार कोटी आहेत मात्र, शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी तीस हजार कोटी नाहीत. त्या टाॅवरमध्ये काय शेतकरी राहणार आहेत काय?  असा प्रश्न समाजवादी पार्टीचे नेते, आमदार अबु आझमी यांनी केला आहे.

शेतकरी कर्जमाफीसह शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी निघालेल्या विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेनिमित्त ते नाशिकला आले होते. यावेळी `सरकारनामा`च्या प्रतिनिधीशी बोलतांना ते म्हणाले, ''मुंबईहून अहमदाबादसाठी एक लाख कोटींची 'बुलेट ट्रेन' फडणवीस सरकारला करायची आहे. सत्तर हजार कोटींचे बुर्ज खलीफापेक्षा मोठे टाॅवर त्यांना उभारायचे आहेत. हे सर्व कोणासाठी? मुठभर श्रीमंतासाठीच ना''

या टाॅवरमध्ये शेतकरी रहायला जाणार आहेत काय? बुलेट ट्रेनमध्ये शेतकरी प्रवास करतील काय? असे विचारत ते म्हणाले, "आज आम्ही महाराष्ट्रात फिरतो आहोत. शेतक-यांची अतिशय विदारक व वेदनादायी स्थिती आहे. त्यांचा टाहो जर सरकारच्या कानी पडत नसेल तर असंवेदनशील व भावनाहीन लोक सरकारचे नेतृत्व करीत आहेत, त्यांना महाराष्ट्राच्या भावना कळत नाही असेच म्हणावे लागेल.''

ते पुढे म्हणाले, '"उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार होते. तेथील शेतक-यांची स्थिती एवढी वाईट नाही. लोकसंख्याही महाराष्ट्रापेक्षा कमी अन् अर्थसंकल्पही आपल्यापेक्षी लहान असतो. तरीही त्यांनी एक लाखापर्यंतचे कर्ज माफ केले. आपल्याकडील शेतक-यांची स्थिती खुप बिकट आहे व ते सतत कर्जमाफीची मागमी करीत आहेत. त्यामुळे ताबडतोब कर्जमाफी करावी. अन्यथा अतिशय तीव्र स्वरुप पुढच्या टप्प्यात सघर्ष यात्रेला मिळेल. त्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असेल."

रंग बदलती दुनिया मे....
आम्ही जेव्हा आज जुने दिवस आठवतो तेव्हा गंमत वाटते. विरोधी पक्षनेते असतांना देवेंद्र फडणवीस शेतक-यांविषयी तावातावाने बोलत असत. शेतक-यांनाही या नेत्याला आपल्याविषयी किती तळमळ आहे असे वाटत होते. आज मात्र हे फडणवीस सत्तेचा वापर शेतक-यांएैवजी श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यासाठी करीत आहे. किती लवकर त्यांनी रंग बदलला. हे पाहून खुप खेद, खंत अन् आश्र्चर्यही वाटते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख