राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारणीला बसणार चाप - दोन किलोमीटर परिसरात एकच पुतळा - Govt declares guidlines for statue erection | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारणीला बसणार चाप - दोन किलोमीटर परिसरात एकच पुतळा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मे 2017

नांदेड - राष्ट्रपुरुषांबाबत सन्मान व्यक्त करण्यासाठी त्यांचे पुतळे उभे केले जातात. मात्र, संबंधितांकडून या पुतळ्यांच्या देखभाल दुरुस्तीची आणि सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली जात नाही. काही प्रसंगी पुतळ्याचे विटंबन होऊन जातीय वाद निर्माण होण्याचा प्रसंग घडतो. त्यावर चाप बसण्यासाठी राज्य शासनाने पुतळा धोरण निश्‍चित केले आहे.

नांदेड - राष्ट्रपुरुषांबाबत सन्मान व्यक्त करण्यासाठी त्यांचे पुतळे उभे केले जातात. मात्र, संबंधितांकडून या पुतळ्यांच्या देखभाल दुरुस्तीची आणि सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली जात नाही. काही प्रसंगी पुतळ्याचे विटंबन होऊन जातीय वाद निर्माण होण्याचा प्रसंग घडतो. त्यावर चाप बसण्यासाठी राज्य शासनाने पुतळा धोरण निश्‍चित केले आहे.

राज्य शासनाने पुतळा उभारणीबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार यापुढे दोन किलोमीटरच्या परिसरात एका राष्ट्रपुरुषांचा एकच पुतळा उभारता येईल. हा पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी बंधनकारक आहे. पुतळा खासगी जागेत उभारायाचा असला तरी त्या जागेबाबत कोणताही वाद नाही, याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित पोलिस ठाण्याकडून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे यापुढे पुतळे उभारण्यावर नियंत्रण येणार आहे.

अशा आहेत सूचना
०- जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभारता येणार नाही.

०- जागेबाबतच्या मालकी हक्काबाबत वाद नसावा.

०- पुतळा उभारणीसाठी जागा निश्चित केल्यानंतर ती जागा अन्य प्रयोजनासाठी कुणालाही वापरता येणार नाही.

०- पुतळा बसविण्यासाठी सर्व तपशीलासह मुख्य वास्तुशास्त्रज्ञ किंवा त्यांनी अधिकार प्रदान केलेल्या विभागीय कार्यालयालयाची मान्यता बंधनकारक.

०- पुतळ्यामुळे गाव किंवा शहराच्या साैंदर्यात बाधा येणार नाही, याची दक्षता घ्यावा.

०- पुतळ्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, याचा तपास करून तसे नाहरकत प्रमाणपत्र संबंधित पोलिस ठाण्याकडून घेणे बंधनकारक.
०- वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही.

०- भविष्यातील रस्ते रुंदीकरणाला बाधा येणार नाही.

०- पुतळ्याची देखभाल, पावित्र्य राखण्याची जबाबदारी संबंधित संस्थांची राहील.

०- पुतळा उभारताना संबंधित राष्ट्रपुरुषांचा पुतळा दोन किलोमीटर परिसरात नसावा.

०- पुतळा उभारण्याचा ठराव एक वर्षापेक्षा जुना नसावा.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख