हेल्मेट नसेल तर एक हजार रुपये दंड : मोदी सरकारचे पुन्हा नवे विधेयक

हेल्मेट नसेल तर एक हजार रुपये दंड : मोदी सरकारचे पुन्हा नवे विधेयक

पुणे : तुम्ही दुचाकीवर जाताना हेल्मेट परिधान केले नसेल तर एक हजार रूपयांच्या दंडाची तरतूद करणाऱ्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. हे विधेयक मोदी सरकारच्या गेल्या टर्ममध्येच मांडण्यात आले होते. मात्र राज्यसभेत त्यावर निर्णय़ न झाल्याने मंत्रिमंडळाने पुन्हा त्यास आज मान्यता दिल्याचे वृत्त आहे.

वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबद्दल दंडाची तरतूद काही पट वाढविण्याचे यात प्रस्तावित आहे. विरोधकांचा यास आक्षेप असल्याने हे विधेयक राज्यसभेत रखडले होते. मात्र त्यास मंजुरी मिळण्यासाठी मोदी सरकारने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. ज्यांनी या वाहतूक नियमांची अंमलबजावणी करायची आहे, त्यांनीच त्याचे पालन केले नाही तर या दंडाची रक्कम दुप्पट होणार आहे. 

यातील काही ठळक तरतुदींनुसार रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून न दिल्यास तब्बल दहा हजार रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच ड्रायव्हिंग लायसन रद्द झाल्यानंतर वाहन चालविल्यास दहा हजारांचा दंड होऊ शकतो. 18 वर्षांखालील मुलाने वाहन चालविणे, वेग मर्य़ादा तोडणे, दारू पिऊन वाहन चालविणे, ओव्हरलोड या सर्व बाबींसाठी मोठा दंड यानुसार भरावा लागू शकतो. 

वेगमर्य़ादा तोडणाऱ्यांसाठी एक ते दोन हजार रूपये दंड प्रस्तावित आहे. विनाविमा वाहनासाठी दोन हजार, विना हेल्मेटसाठी एक हजार रूपये आणि तीन महिने लायसन्स निलंबित करणे, अशा दोन्ही शिफारशी केल्या आहेत. 18 वर्षे पूर्ण होण्याच्या आधी वाहन चालविणाऱ्या युवकांकडून अपघात झाल्यास त्याबद्दल पालकांना जबाबदार धरले जाणार आहे. तसेच त्यासाठी 25 हजार रूपये दंडाची आणि तीन महिने शिक्षची तरतूद करण्यात आली आहे. वाहतुकींच्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल आता शंभर रूपयांऐवजी पाचशे रूपयांचा दंड करण्यात येईल. दारू पिऊन वाहन चालविल्याबद्दल दहा हजार रूपयांचा दंड प्रस्तावित आहे. ओव्हरस्पिडींगसाठी वीस हजार रूपये भरावे लागतील.

वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनासाठी विविध तरतुदींखाली एकूण एक लाख रूपयांचा दंड आकारण्यास यात मुभा देण्यात आली आहे.


  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com