govn must give reservation to maratha harshwardhan jadhav | Sarkarnama

आरक्षण सरकारच्या बापाला द्याव लागेल ; हर्षवर्धन जाधव गरजले 

जगदीश पानसरे 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद ः मराठा आरक्षणासाठी उभा केलेला लढा यशस्वी होणारच आहे. या आंदोलनाचा शेवट गोड होईल पण तरुणांनी थोडा संयम बाळगावा. कायदा हातात घेऊन स्वतःवर गुन्हे दाखल करून घेऊ नका, आरक्षण सरकारच्या बापाला द्याव लागेल, सरकार पळून जाऊ शकत नाही असा इशारा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला. 

औरंगाबाद ः मराठा आरक्षणासाठी उभा केलेला लढा यशस्वी होणारच आहे. या आंदोलनाचा शेवट गोड होईल पण तरुणांनी थोडा संयम बाळगावा. कायदा हातात घेऊन स्वतःवर गुन्हे दाखल करून घेऊ नका, आरक्षण सरकारच्या बापाला द्याव लागेल, सरकार पळून जाऊ शकत नाही असा इशारा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला. 

नंदुरबारहून परत आल्यानंतर कन्नडजवळील पिशोरनाका येथे हर्षवर्धन जाधव यांचे स्वागत करून वाहन रॅली काढण्यात आली. त्यानंतर केलेल्या भाषणात जाधव म्हणाले, की मराठा आरक्षण आपण कुणाच्या तरी वाट्याचे मागतोय असा गैरसमज जाणीवपुर्वक पसरवला जात आहे. पण तामिळनाडूच्या धरतीवर 69 टक्‍के आरक्षण द्या आणि मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण आपण मागतोय. एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणातून नाही, आम्हाला अतिरिक्त आरक्षण पाहिजे आहे. 

आंदोलन, बलिदान करूनही काही होत नसल्याने आपण सगळे उद्विग्न झालो आहोत. दोन वर्षापुर्वी विधानसभेच्या सभागृहात मी मराठा आरक्षणावर बोलायला लागलो तर मला बोलू दिल नव्हतं, त्याचा व्हिडिओ देखील उपलब्ध आहे. पण आज मराठा तरूण आपले जीव देत आहेत, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कुणीही आत्महत्या करू नका. जर मराठा तरुण असेच आत्महत्या करत राहिले तर मग आरक्षण कुणासाठी मागायच. 

छत्रपती शिवाजी महाराज मुघलांच्या विरोधात लढले तेव्हा स्वराज्य मिळाले. तुम्हालाही लढाव लागेल, रडायंच नाही. 

मलाही टेंशन येतं पण...! 

आंदोलनाचा परिणाम सरकारवर काहीच होत नाही हे जरी खर असल तरी कायदा कुणीही हातात घेऊ नका. सरकारला हेच पाहिजे आहे. आपण हाणामाऱ्या केल्या, तोडफोड केली की गुन्हे दाखल होतील. अनेकदा आपल्या पोरांनी काही केले नाही तरी 307 चे गुन्हे दाखल केले जात आहेत. मग हाणामाऱ्या केल्यातर 302 च लावतील. तरूणांमध्ये खूप संताप आहे याची मला जाणीव आहे. मलाही खूप टेंशन येत, मी स्वतःला कस तरी सावरतोय, पण उद्या मी हाणामाऱ्या करायला लागलो तर अवघड होऊन जाईल. 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मी एक पाऊल उचलल आणि आमदारकीचा राजीनामा दिला. माझ्यानंतर भाऊसाहेब पाटलांनी राजीनामा दिला, पण इतर आमदार काहीच करत नाहीयेत. त्यांना भिती वाटते उद्या निवडणूक लढवायची, पक्षाने तिकीट दिले नाही तर काय? या भितीपोटी हे हिजडे काहीच करत नाहीये. पण मी हिजडा नाही, मर्द आहे मराठा समाजाची मुल आत्महत्या करत असतांना मी गप्प बसणार नाही. 

उद्या निवडणूकीत काय व्हायचं ते होऊ देत. फारफार तर काय होईल कन्नडची आमदारकी जाईल. झालो ना दोनवेळा आमदार, आता लागतंय कुणाला. पण आज ती वेळ नाही, पुढच्या पेढे पाहू. माझे तुम्हाला हात जोडून आवाहन आहे, कुणीही कायदा हातात घेऊ नका, शांततेत आंदोलन करा, तरुणांना आत्महत्या करण्यापासून रोखा. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख