"सरकारनामा' च्या गोविंद तुपे यांना मुंबई स्टार रिपोर्टर पुरस्कार - govind tupe awarad | Politics Marathi News - Sarkarnama

"सरकारनामा' च्या गोविंद तुपे यांना मुंबई स्टार रिपोर्टर पुरस्कार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जून 2017

आपल्या देशात लागू झालेला माहिती अधिकार कायदा हा राज्याने देशाला दिलेली मोठी देणगी आहे. पण राज्यातील मंत्री कार्यालयांमध्ये माहिती अधिकार कायदा लागू केला जात नव्हता. त्यासाठी मी सतत पाठपुरावा केला. मुख्य माहिती आयुक्तांनी दखल घेऊन मंत्री कार्यालयांना हा कायदा लागू करण्याचा आदेश दिला.

मुंबई : मुख्य माहिती आयुक्तांकडे तक्रारी करून राज्य सरकारमधील सर्व मंत्री कार्यालये माहिती अधिकार कक्षेत आणण्यासाठी पाठपुरावा करणारे "सरकारनामा'चे वरिष्ठ बातमीदार गोविंद तुपे यांना मुंबई प्रेस क्‍लबच्या 'रेड इंक मुंबई स्टार रिपोर्टर' या पुरस्काराने आज गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृती चिन्ह, शाल व एक लाख रूपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

यावेळी ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना तुपे म्हणाले की, आपल्या देशात लागू झालेला माहिती अधिकार कायदा हा राज्याने देशाला दिलेली मोठी देणगी आहे. पण राज्यातील मंत्री कार्यालयांमध्ये माहिती अधिकार कायदा लागू केला जात नव्हता. त्यासाठी मी सतत पाठपुरावा केला. मुख्य माहिती आयुक्तांनी दखल घेऊन मंत्री कार्यालयांना हा कायदा लागू करण्याचा आदेश दिला. त्यानंतरही राज्य सरकारने हा कायदा मंत्री कार्यालयांना लागू करण्यास महिने उशीर केला. उशिरा का होईना हा कायदा लागू केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. 

पुरस्कारप्राप्त पत्रकारांची नावे पुढीलप्रमाणे : 
जीवनगौरव पुरस्कार-विनोद दुवा, वर्षातील मानकरी - राजकमल झा-इंडियन एक्‍सप्रेस, विशेष प्रभाव पुरस्कार-राहुल कुलकर्णी-एबीपी माझा विभाग- माध्यम, अन्य पुरस्कार विजेत्याची नावे पुढीलप्रमाणे ( नाव, संस्था, विभाग या क्रमानुसार) राजकारण-मुद्रित माध्यम-राधाकृष्णन कंदथ-फ्रंटलाईन, राजकारण-टीव्ही-श्रीनिवासन जैन- एनडीटीव्ही, विज्ञान आणि शोध-मुद्रित माध्यम-(1)नित्यानंद राव-द वायर (2)विराट मार्कंडेय-द वायर, विज्ञान आणि शोध-टीव्ही-आमीर रफीक पीरजादा-एनडीटीव्ही, मानवाधिकार-मुद्रित-(1)इप्सिता चक्रवर्ती-स्क्रोल.इन (2) रायन नक्‍श- स्क्रोल.इन, मानवाधिकार-टीव्ही-(विभागून) (1)अभिसार शर्मा-एबीपी न्यूज (2) माया मिरचंदानी-एनडीटीव्ही व्यापार-मुद्रित-सारिका मल्होत्रा-बिझनेस टुडे व्यापार-टीव्ही-अर्चना शुक्‍ला-सीएनबीसी टीव्ही 18 बीग पिक्‍चर -मुद्रित-आशिष शर्मा-ओपन मॅगझीन, उपविजेता-कुणाल पाटील-हिंदुस्थान टाइम्स, पर्यावरण-मुद्रित-(विभागून)(1)तुषार धारा-फर्स्ट पोस्ट, (2) संजय सावंत- फर्स्ट पोस्ट, (3)श्रद्धा घाटगे- फर्स्ट पोस्ट, (4) निरध पांढरीपांडे- फर्स्ट पोस्ट, (5) राज मिश्रा-दैनिक जागरण पर्यावरण-टीव्ही-राजेश कुमार-इंडिया न्यूज, क्रीडा-मुद्रित-स्वरुप स्वामिनाथन-द न्यू इंडियन एक्‍स्प्रेस, क्रीडा-टीव्ही-विभागून (1)मौमिता सेन-इंडिया टुडे टीव्ही, (2) राजीव मिश्रा-इंडिया न्यूज/वन टीव्ही नेटवर्क, आरोग्य-मुद्रित-प्रियांका व्होरा-स्क्रोल.इन आरोग्य-टीव्ही-अर्चना शुक्‍ला-सीएनबीसी टीव्ही 18, गुन्हे-मुद्रित-आलिया अल्लाना-फांऊटेन इंक गुन्हे-टीव्ही-अतिर खान-इंडिया टुडे टीव्ही जीवनशैली आणि मनोरंजन-मुद्रित-कथकली चंदा-फोर्बस्‌ इंडिया, जीवनशैली आणि मनोरंजन -टीव्ही-बिजू पंकज-मातृभूमी न्यूज 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख