Governt has not yet paid 250 crores to pulses producing farmers | Sarkarnama

तूर खरेदी :शेतकर्‍यांचे अडीचशे कोटी रूपये देणे बाकीच!

संदीप खांडगेपाटील
शुक्रवार, 5 मे 2017

सरकारने राज्याच्या ग्रामीण भागातून ३२७ खरेदी केंद्राच्या माध्यमातून २ लाख ७७ हजार ९९६ शेतकर्‍यांकडून ४१ लाख ५१ हजार तुर खरेदी केली. 
या तुर खरेदीची किमंत २ हजार कोटी ९६ लाख ८० रूपये राज्य सरकारने शेतकर्‍यांना देणे आवश्यक असतानाही राज्य सरकारकडून २२ एप्रिलपर्यत फक्त १ हजार ७५४ कोटी  ७७ लाख रूपये शेतकर्‍यांना देण्यात आले

मुंबई : एकीकडे शतकार्याकडे शिल्लक असलेली तुरे खरेदी करण्याचा प्रश्न गंभीर झालेला असताना  दुसरीकडे  सरकारने नाफेड मार्फत  २२ एप्रिलपर्यत खरेदी केलेल्या तुरीचे  २५० कोटी रूपये  अजून शेतकर्‍यांना दिले नसल्याने शेतकर्‍यांच्या संतापात आणखीनच भर पडली आहे.

राज्य सरकारने २२ एप्रिलपर्यत पणन महासंघ, विदर्भ मार्केटींग फेडरेशन, महा.एफ.पी ओ आणि आदिवासी महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील शेतकर्‍यांची तूर खरेदी केली.  या चार जणांच्या माध्यमातून राज्य सरकारने राज्याच्या ग्रामीण भागातून ३२७ खरेदी केंद्राच्या माध्यमातून २ लाख ७७ हजार ९९६ शेतकर्‍यांकडून ४१ लाख ५१ हजार तुर खरेदी केली. 

या तुर खरेदीची किमंत २ हजार कोटी ९६ लाख ८० रूपये राज्य सरकारने शेतकर्‍यांना देणे आवश्यक असतानाही राज्य सरकारकडून २२ एप्रिलपर्यत फक्त १ हजार ७५४ कोटी  ७७ लाख रूपये शेतकर्‍यांना देण्यात आले. ३४२ कोटी ३ लाख रूपये शेतकर्‍यांना सरकारकडून २२ एपिेलपर्यत देण्यात आली नव्हती.

मागील दहा दिवसात शेतकर्‍यांच्या तुर खरेदीच्या थकीत असलेल्या ३४२ कोटी ३ लाख रूपयांपैकी राज्य सरकारकडून अंदाजे १०० कोटी रूपये शेतकर्‍यांना देण्यात आले असून उर्वरित २४२ कोटी रूपये येत्या १० ते १२ दिवसात दिले जाणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खरेदी केंद्रावर शेतकर्‍याची शेवटची तूर येईपर्यत तूर खरेदी करण्याचे निर्देश दिले असून खोत यांच्या कार्यालयातून दररोज मार्केटींग फेडरेशनकडून किती तूर खरेदी करण्यात आली आहे, याचा आढावा घेण्यात येत आहे.

 राज्यात सर्वाधिक म्हणजेच जवळपास ६५ ते ७० टक्के तुरीचे उत्पादन एकट्या मराठवाडा व विदर्भात होत असून उर्वरित महाराष्ट्रात जेमतेम ३० ते ३५ टक्के तुरीचे उत्पादन होत आहे. विदर्भ व मराठवाडा सध्या भाजपाचा बालेकिल्ला असला तरी तूर खरेदी प्रकरणामुळे तेथील शेतकर्‍यांकडून राज्य सरकारविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख