राज्यपाल म्हणाले "उद्धवजी, ये सारे लोग आपके साथ है..!

..
uddhav takes oath as maharashtra cm
uddhav takes oath as maharashtra cm

मुंबई  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. सत्तासंघर्षात राज्यपालांनी भाजपला झुकतं माप दिल्याने उद्धव ठाकरे त्यांच्यावर नाराज आहेत.पण आज शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी शिवाजी पार्कातील गर्दीकडे बोट दाखवत "उद्धवजी ये सारे लोग आपके साथ है" अस म्हणत त्यांचं कौतुक केलं.

 विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना-भाजपमध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला.सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी शिवसेनेला भाजप पेक्षा कमी वेळ दिल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले होते. शिवसेनेला अधिकची वेळ देण्यास ही त्यांनी नकार दिला होता.यानंतर उद्धव ठाकरेंनी "राज्यपाल खूपच दयाळू आहेत,असे राज्यपाल सर्वांना मिळोत" अशा भाषेत नाराजी व्यक्त केली होती.या नंतर तर मध्यरात्री राष्ट्रपती राजवट उठवत पहाटे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिल्याने शिवसेनेसाठी राज्यपाल `व्हिलन` ठरले होते.

शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या बाजूला जाऊन बसले. यादरम्यान इतर मंत्र्यांचा शपथविधी सुरू होता.मधल्या वेळात राज्यपाल उद्धव यांच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी शिवाजी पार्कात "उद्धव ठाकरे आज बढो, हम तुम्हारे साथ है" चा जयघोष सुरू होता.यावेळी राज्यपालांनी उद्धव यांच्याकडे पाहिलं आणि गर्दीकडे बोट दाखवत म्हटलं "उद्धवजी लोग मराठी मे जो बोलते है वो मैं समजता नही हु,लेकीन ये जो हिंदी मे नारा दिया वो मैं समज गया".यानंतर गर्दीकडे बोट दाखवत "देखीये उद्धवजी ये सारे लोग आपके साथ है" असं म्हटलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी ही त्यांच्याकडे पाहत स्मितहास्य केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com