governor invite cm fadanvice to form government | Sarkarnama

सत्ता स्थापनेचे राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण ? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले असल्याचे समजते. भाजप सर्वात जागा मिळविणार मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी भाजपचाच अधिकार आहे. 

विधानसभेचा कार्यकाळ आज संपल्याने राज्यपालांनी भाजपला बोलाविणे योग्यच होते. शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणुका लढविल्या पण, निकालानंतर शिवसेनेने 50-50 फॉर्मुला पुढे केल्याने भाजप बॅकफुटवर गेला होता. महायुतीकडे बहुमत असतानाही फडणवीस सत्ता स्थापन करू शकले नव्हते. शिवसेना भाजपपेक्षा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या अधिक जवळ गेल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. 

मुख्यमंत्री सत्तास्थापन करून बहुमत कसे सिद्ध करतात की सत्ता स्थापन करण्यास नकार देतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यातील कॉंग्रेसचे आमदार जयपूरला असून शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत एका हॉटेलमध्ये आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहणार असल्याचे दिसते. विशेषत: शिवसेना काय करणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख